महिना झाला तरी दामूनगरला मदत नाही

By admin | Published: January 7, 2016 01:03 AM2016-01-07T01:03:48+5:302016-01-07T01:03:48+5:30

कांदिवली पूर्वेकडील दामूनगरला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेला गुरुवारी (७ जानेवारी) एक महिना पूर्ण होत असला तरी अद्यापही येथील दुर्घटनाग्रस्तांना शासनाकडून २५ हजार रुपयांची मदत मिळालेली नाही.

Though the month is not helping Damunagar | महिना झाला तरी दामूनगरला मदत नाही

महिना झाला तरी दामूनगरला मदत नाही

Next

मनोहर कुंभेजकर,  मुंबई
कांदिवली पूर्वेकडील दामूनगरला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेला गुरुवारी (७ जानेवारी) एक महिना पूर्ण होत असला तरी अद्यापही येथील दुर्घटनाग्रस्तांना शासनाकडून २५ हजार रुपयांची मदत मिळालेली नाही.
७ डिसेंबर २०१५ रोजी दामूनगरला मोठी आग लागली होती. या दुर्घटनेत हजारो झोपड्या जळून खाक झाल्या होत्या आणि येथील सर्वच संसार उघड्यावर आले होते. सामाजिक सेवाभावी संस्थांनी केलेल्या मदतीनंतर परिस्थिती काहीशी पूर्ववत झाली असली तरी पूर्णत: नीटनेटकी झालेली नाही. १२०० आपदग्रस्तांना उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केवळ ३ हजार ८०० रुपयांची मदत करण्यात आली असून, ती पुरेशी नाही. महत्त्वाचे म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी येथील नागरिकांना आर्थिक मदत मिळावी आणि त्यांचे पुनर्वसन याच ठिकाणी व्हावे यासाठी आमदार प्रकाश सुर्वे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे आवाज उठवला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र अद्याप दुर्घटनाग्रस्तांपर्यंत मदत पोहोचलेली नाही.
पालिकेकडून पुरविण्यात आलेले जनरेटर जलखात्याचे होते. अत्यावश्यक सेवा म्हणून ते दामूनगरला देण्यात आले होते. जनरेटर काढण्यात आले असले तरी पर्यायी वीजपुरवठ्यासाठी घटनास्थळी ४५ प्रकाशझोत बसविण्यात आले आहेत.
- साहेबराव गायकवाड, साहाय्यक आयुक्त, आर/दक्षिणदामूनगरच्या आगीनंतर पालिकेच्या आर/दक्षिण विभागाने तत्काळ वीजपुरवठा सुरू केला. परंतु आता येथील जनरेटर बंद पडल्याने दामूनगरमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी भुरट्या चोरांची संख्या वाढली आहे आणि येथे चोरांची दहशत पसरली आहे.
- राधा थोरात

Web Title: Though the month is not helping Damunagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.