नागरी परिवहनसाठी हजार कोटी
By Admin | Published: March 27, 2015 02:00 AM2015-03-27T02:00:03+5:302015-03-27T02:00:03+5:30
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) नव्या आर्थिक वर्षातील ३ हजार ८३२.३० कोटीच्या अर्थसंकल्प गुरुवारी मंजूर करण्यात आला आहे.
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) नव्या आर्थिक वर्षातील ३ हजार ८३२.३० कोटीच्या अर्थसंकल्प गुरुवारी मंजूर करण्यात आला आहे. मुंबईतील नागरी परिवहन प्रकल्पासाठी सर्वाधिक एक हजार ५ कोटींची तरतूद करण्यात आलेली असून पूर्णपणे तोट्यात चाललेल्या मोनो रेलच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी ४०२.६० कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. भाजपाशिवाय सर्व राजकीय पक्ष व मुंबईकरांचा विरोध वाढत असलेल्या मेट्रो-३ साठी १८० कोटींची तरतूद केली आहे.