आपल्या वाहनावर हजारोंचा दंड तर नाही ना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:09 AM2021-08-25T04:09:08+5:302021-08-25T04:09:08+5:30

मुंबई : वाहन खरेदी करताना आपला मोबाइल क्रमांक त्यासाठी नोंदणी करावा लागतो. परिवहन विभागाकडेही आपल्या वाहनाच्या क्रमांकासोबतच तो जोडलेला ...

Thousands of fines on your vehicle | आपल्या वाहनावर हजारोंचा दंड तर नाही ना

आपल्या वाहनावर हजारोंचा दंड तर नाही ना

Next

मुंबई : वाहन खरेदी करताना आपला मोबाइल क्रमांक त्यासाठी नोंदणी करावा लागतो. परिवहन विभागाकडेही आपल्या वाहनाच्या क्रमांकासोबतच तो जोडलेला असतो. अनेकजण त्यानंतर हा मोबाइल क्रमांक बदलतात. जुन्याच क्रमांकावर दंडाचे मेसेज जातात. वेळीच आपला मोबाइल क्रमांक वाहनाला जोडून घेतला पाहिजे. वाहनांवर हजारोंचा दंड तर नाही ना हे पाहायला हवे.

कसे फाडले जाते ई-चलान?

मुंबईत वाहतूक शाखेच्या वतीने कार्यरत असलेल्या सर्व वाहतूक पोलिसांना २०१७ पासून ई-चलानचे मशीन देण्यात आले आहे. ई-चलान पद्धतीद्वारे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना दंड आकारला जातो. संबंधित वाहनधारकाच्या समोरील किंवा मागील बाजूस असलेल्या नंबर प्लेटवरील नंबरचा फोटो काढून त्या नंबरचे वाहन ज्याच्या नावे आहे, त्याच्या नावाने तो दंड आकारला जातो. या दंडाचा एसएमएस फोटो काढल्यानंतर संबंधिताच्या मोबाइलवर पाठविला जातो. त्यानुसार पंधरा दिवसांत हा दंड भरणे बंधनकारक असते.

---

मोबाइल अपडेट केला आहे का?

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन खरेदी केल्यानंतर नोंदणीसाठी गेल्यानंतर तेथे आपल्या मोबाइल नंबरची नोंदणी करणे आवश्यक आहे. जो मोबाइल नंबर आपण वापरतो तोच मोबाइल नंबर या कार्यालयात नोंदणीकृत करावा. जेणेकरून वाहन चालविताना नियम मोडल्यानंतर लावलेला दंड किंवा अपघात तसेच वाहन चोरीस गेल्यानंतर संबंधित वाहनाचा शोध घेणे यासाठी मोबाइल नंबरचा उपयोग होऊ शकतो. अनेकजण बंद असलेले किंवा चुकीचे मोबाइल नंबर देतात, तर काही जण मोबाइल नंबरची नोंदणी करतच नाहीत.

----

दंडाची थकबाकी वाढली

दुचाकी असो की चारचाकी, सर्व वाहनांना ई-चलानद्वारेच दंड लावला जातो. वेगवेगळ्या कलमान्वये दंडाची रक्कम ठरवून दिली आहे. त्यानुसार नियम मोडल्यानंतर जे कलम लावले आहे, त्याचा दंड लावला जातो. नियम मोडला असेल तर मोबाइल मेसेज येतो. मोबाइलवर आलेल्या मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवरून दंड भरता येतो. मात्र, अनेक जण हा दंड वेळेत भरत नाहीत. यानंतरही पुन्हा बऱ्याच वेळेला चलान फाडले जाते. परंतु, दंड भरण्याकडे दुर्लक्ष केले जाते. यातून पोलिसांना वाहन पकडल्यानंतर दंडाची रक्कम न भरल्याचे आढळल्यास ते वाहन जप्त करण्याचा अधिकार दिला आहे.

-------

ई-चलानद्वारे झालेला दंड

वर्ष -ई-चलान- दंड भरला - दंड बाकी

२०१७- ३६. १ लाख -१५. २ कोटी -८३.६ कोटी

२०१८ - ३३ लाख -७५-७ कोटी -६२. ५ कोटी

२०१९ - ४९. ४ लाख -४४. ७ कोटी -९३.७ कोटी

२०२० - ४३. २ लाख -१८. ३ कोटी -११९. ५ कोटी

२०२१ (जानेवारी ते जुलैपर्यंत ) - ३३ लाख -७५-७ कोटी -६२. ५ कोटी

Web Title: Thousands of fines on your vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.