हजारो जपानी घेत आहेत अहिंसेची शिकवण देणाऱ्या जैन धर्माची दीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 02:55 AM2020-02-25T02:55:21+5:302020-02-25T02:55:37+5:30

दीक्षा घेतल्यानंतर जपानहून तीर्थयात्रेसाठी भारतात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

Thousands of Japanese are taking the initiation of Jainism, which teaches non-violence | हजारो जपानी घेत आहेत अहिंसेची शिकवण देणाऱ्या जैन धर्माची दीक्षा

हजारो जपानी घेत आहेत अहिंसेची शिकवण देणाऱ्या जैन धर्माची दीक्षा

googlenewsNext

मुंबई : हजारो जपानी शांती आणि अहिंसेची शिकवण देणाºया जैन धर्माची दीक्षा घेत आहेत. दीक्षा घेतल्यानंतर जपानहून तीर्थयात्रेसाठी भारतात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

२००६ मध्ये जपानी नागरिक चुरुशी मियाजावा भारत भेटीस आल्या होत्या. या दरम्यान त्यांची भेट स्व. जयंतसेन सुरीश्वरजी म. सा. यांच्याशी झाली. त्यांच्याकडून जैन धर्माबद्दल ऐकल्यानंतर त्या प्रभावित झाल्या आणि त्यांनी जैन धर्माची जीवनपद्धती स्वीकारली. त्यानंतर सर्व सुखाचा त्याग करून त्या साधे जीवन जगू लागल्या. तुलसी असे नाव धारण केल्यानंतर त्यांनी विरोध असताना जैन धर्माची दीक्षा घेतली.

तुलसी यांनी दिलेल्या माहितीनुसार स्व. जयंतसेन सुरीश्वरजी म. सा. यांनी जपानमध्ये जैन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली. त्या भारतात पाचवेळा आल्या आहेत. प्रत्येकवेळी त्यांच्यासमवेत जैन धर्म स्वीकारलेल्या जपानी नागरिकांची संख्या शेकडोने असते. दरवर्षी अनेक जपानी नागरिक गुजरातमधील पालिताना आणि शंखेश्वर येथे येऊन जैन धर्म स्वीकारतात. सातव्या शतकात झेन्कोजी मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या होंशू बेटावरील नगानोनंतर आता जैन धर्म जपानच्या ओसाका आणि टोकियोपर्यंत पोहोचला आहे.

जैन धर्म चांगल्या प्रकारे अनुसरण करता यावे, यासाठी अनेक जपानी हिंदी भाषा शिकत आहेत. मागच्या महिन्यात २५०० जपानी नागरिक गुजरातच्या थराड येथे जयंतसेन सुरीश्वरजी म. सा. यांच्या शिष्यांसमवेत एक आठवडा होते. येथे येणारे जपानी नागरिक सूर्यास्ताआधी सात्त्विक आहार घेतात. प्रार्थना आणि ध्यानधारणा करीत दिवस घालवितात.

जैन धर्म स्वीकारणाºया जपानी नागरिकांनी पर्यषुण पर्वाचेही पालन करतात. ते ८ दिवसांच्या उपवासात गरम पाणी प्राशन करतात. जैन धर्माचे अहिंसा ते तत्त्व आमच्यासाठी प्रेरणादायी आहे, असे ते म्हणतात.
 

Web Title: Thousands of Japanese are taking the initiation of Jainism, which teaches non-violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Japanजपान