हजाराची नोट 5क्क् रुपयांत
By admin | Published: October 1, 2014 02:34 AM2014-10-01T02:34:57+5:302014-10-01T02:34:57+5:30
चलनी नोटांप्रमाणो अगदी अस्सल वाटाव्यात, अशा बनावट नोटा वटविण्यासाठी आलेल्या तिघा जणांच्या टोळीला ठाणो गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती पथकाने मोठय़ा शिताफीने अटक केली.
Next
>ठाणो : चलनी नोटांप्रमाणो अगदी अस्सल वाटाव्यात, अशा बनावट नोटा वटविण्यासाठी आलेल्या तिघा जणांच्या टोळीला ठाणो गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती पथकाने मोठय़ा शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून दोन लाखांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत. भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी परदेशातूनच या नोटा आल्याची शक्यता एका अधिका:याने व्यक्त केली आहे.
मुबारक उर्फ सिराजूल उर्फ बुधवा इम्तियाज शेख (3क्), मर्जिना मुबारक शेख (27), आणि बिसरु उर्फ बिसरदी जारदीश शेख (42) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यापैकी मुबारक आणि मर्जिना हे कळव्यातील भास्करनगरचे रहिवासी असून मूळचे दिमारीटोला, झारखंडचे आहेत, तर बिसरू हा रे रोड जवळच्या नारळवाडीत सोनापूर मशिदीसमोर राहतो. तो मूळचा उत्तराखंडचा आहे. यामध्ये पश्चिम बंगालमधील त्यांच्या आणखी एका साथीदाराचा समावेश आहे. त्याचाही शोध घेण्यात येत असल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त पराग मणोरे यांनी सांगितले.
नौपाडा भागातील तलावपाळी परिसरात 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6च्या सुमारास हे तिघे नोटा वटविण्यासाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांना मिळाली होती. निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर या नोटा काही समाजकंटकांना वटविण्याचीही या टोळीची योजना होती. यातील मुबारक आणि मर्जिना या दोघांविरुद्ध नवी मुंबईमध्ये बनावट नोटा वटविल्याप्रकरणी यापूर्वीच गुन्हा दाखल झालेला आहे.
याच माहितीच्या आधारे सहायक पोलीस आयुक्त नागेश लोहार आणि पोलीस निरीक्षक घेवारे यांच्या पथकाने तलावपाळी भागातून वरील तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन लाखांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
पाचशे आणि एक हजारांच्या या नोटा अगदी भारतीय चलनी नोटा छापणा:या कारखान्यातूनच छापल्यासारख्या दिसतात. या नोटांवरील मध्यभागी असणारी हिरवी पट्टी आणि त्यावरील आरबीआय ही अक्षरे मात्र या टोळक्याला छापता आलेली नाहीत. त्यामुळे निरखून पाहिल्यास बनावट असल्याचे समजते. आता या नोटा पारखण्यासाठी रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि नाशिक येथील चलनी नोटांच्या कारखान्यातील अधिका:यांचीही मदत घेणार असल्याची माहिती उपायुक्त पराग मणोरे यांनी दिली.
आंतरराज्य टोळी : या नोटा वटविताना एक हजाराची एक नोट 5क्क् रुपयांना तर पाचशेची एक नोट 25क् रुपये घेऊन वटविली जात होती. यासाठी गि:हाईक शोधत असतानाच या टोळीला पकडण्यात आले. ही आंतरराज्य टोळी असून शत्रू राष्ट्राचाही यात हात असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.