हजारो मुंबईकरांनी केली सूतकताई! महाखादी कलासृष्टी प्रदर्शनाला मिळतोय प्रतिसाद

By स्नेहा मोरे | Published: February 23, 2024 08:46 PM2024-02-23T20:46:39+5:302024-02-23T20:47:40+5:30

हे प्रदर्शन २५ फेब्रुवारी पर्यंत सुरु आहे.

thousands of mumbaikar did sutaktai maha khadi art exhibition is getting response | हजारो मुंबईकरांनी केली सूतकताई! महाखादी कलासृष्टी प्रदर्शनाला मिळतोय प्रतिसाद

हजारो मुंबईकरांनी केली सूतकताई! महाखादी कलासृष्टी प्रदर्शनाला मिळतोय प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महात्मा गांधी यांनी खादीला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यामुळे खादीच्या कपड्यांना मोठे वलय निर्माण झाले आहे. याच विचारातून वांद्रे कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदानावर राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने महाखादी कलासृष्टी प्रदर्शनात हजारो मुंबईकरांनी प्रत्यक्ष सूतकताईचा आनंद लुटला आहे. याखेरीस, पैठणीही कशी तयार होते, याचा निर्मिती प्रवास उलगडल्याने महिला वर्गाकडून या प्रदर्शनाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. हे प्रदर्शन २५ फेब्रुवारी पर्यंत सुरु आहे.

राज्यातील १२५ पेक्षा जास्त लघुउद्योजक सहभागी झाले आहेत. प्रदर्शनात खादी, पैठणी, हिमरू शाल, मध, हस्तकला, वारली पेंटिंग्ज, बांबूपासून तयार वस्तू, कोल्हापूरी चप्पल, ज्वेलरी, मसाले इत्यादी दर्जेदार गोष्टींचा समावेश आहे. फरोग मुकादम यांनी या प्रदर्शनामध्ये पैठणी कशी तयार होते याचे प्रात्यक्षिक या प्रदर्शनात पाहायला मिळत आहे. प्रदर्शनातील एक्स्पिरियन्स सेंटरमध्ये प्रत्यक्ष वस्तूंची निर्मिती प्रवासाचा अनुभव देणारा आहे, त्यामुळे मुंबईकरांसह पर्यटकांसाठी हे आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरत आहे. याखेरीस, याशिवाय स्वयं सहायता महिला बचत गटाच्या खाद्य पदार्थांची मेजवानी, विविध प्रांतातील स्वादिष्ट व रुचकर पारंपरिक खाद्यपदार्थांची रेलचेल देखील या प्रदर्शनात अनुभवता येते. या प्रदर्शनाला आतापर्यंत हजारो मुंबईकरांनी भेटी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे, जेष्ठ दिगदर्शक राजदत्त, संगीतकार श्रीधर फडके, अभिनेत्री स्मिता तांबे, मनवा नाईक या मान्यवरांनी भेटी देऊन प्रदर्शनाचे कौतुक केले आहे.

सूतकताईचा अनुभव आनंद देणारा

प्रदर्शनात सूतकताईचे प्रात्यक्षिक हे एकाग्रता आणि जीवनानंदाच्या अनुभूतीशी जोडणारे आहे. या ठिकाणी टकळीच्या सहाय्याने सूतकताई करता येते. यावेळी केलेले सूत अत्यंत दर्जेदार असते, असेही समोर आले आहे. हे कापड हात लावून उपस्थितांना नवनिर्मितीचा अत्यानंद अनुभवता येतो, अशा प्रतिक्रिया सूतकताई करणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. तसेच, महात्मा गांधींनी सांगितलेले विचार हे केवळ मिथक नसून तो जीवनानंद आहे, याचीच अनुभूती हे प्रदर्शनाला भेट देणारे घेत आहेत.

Web Title: thousands of mumbaikar did sutaktai maha khadi art exhibition is getting response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई