Join us

आरक्षणाच्या मागणीवर मराठा समाजाचे हजारो लोक आझाद मैदानात ठाण मांडून! 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 3:32 PM

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा पुढचा आदेश जरांगे पाटील देत नाहीत. तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, अशी भूमिका घेत लाखो मराठा समाज आझाद मैदानात ठाण मांडून बसला आहे.

श्रीकांत जाधव -

मुंबई : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा पुढचा आदेश जरांगे पाटील देत नाहीत. तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, अशी भूमिका घेत लाखो मराठा समाज आझाद मैदानात ठाण मांडून बसला आहे. विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय आम्ही येथून जाणार नाही,अशी भूमिका येथील कार्यकर्त्यांनी घेतली आहे.मराठा आरक्षणाच्या लढ्यात जरांगे पाटील यांना पूर्ण समर्थन देण्यासाठी गावागावातील मराठा समाज आज आझाद मैदानात आला आहे. त्यामुळे गुरूवारी संध्याकाळपासून हजारोंच्या संख्येने मराठा बांधव आझाद मैदानात ठाण मांडून बसले आहेत.  

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी जरांगे पाटील आज प्रजासत्ताक दिनी आझाद मैदानात उपोषण करणार आहेत. मात्र त्यांना मुंबईच्या वेशीवर रोखण्यात आले आहे. तरी सुद्धा  राज्यभरातील कार्यकर्ते जरांगे यांना पाठींबा देण्यासाठी मुंबईत दाखल होत आहेत. मेट्रोच्या कामामुळे आझाद मैदानाची जागा अरुंद झाली आहे. त्यामुळे सध्याच्या जागेत केवळ पाच हजार लोक कसेबसे उभे राहू शकतात. तरी सुद्धा हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक आझाद मैदानाकडे येत आहेत.   

टॅग्स :मराठा आरक्षणआरक्षण