शिवसेनेचे हजारो शिवसैनिक शिवाजी पार्कला जाण्यासाठी सज्ज
By मनोहर कुंभेजकर | Published: October 5, 2022 04:34 PM2022-10-05T16:34:15+5:302022-10-05T16:34:25+5:30
Shiv Sena: विभाग क्रमांक ३ जोगेश्वरी पूर्व,गोरेगाव व दिंडोशी विधानसभा मतदार संघातून सुमारे १०००० ते १२००० शिवसैनिक मेळाव्यासाठी दुपारी चार वाजता वाजत गाजत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी रवाना होणार असल्याची माहिती आमदार-विभागप्रमुख सुनील प्रभू यांनी दिली.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई - पश्चिम उपनगरातून ठाकरे गटाचे हजारो शिवसैनिक शिवाजी पार्कला ट्रेनने दादरला उतरून पुढे वाजत गाजत व जल्लोषात जाणार आहे. विभाग क्रमांक ३ जोगेश्वरी पूर्व,गोरेगाव व दिंडोशी विधानसभा मतदार संघातून सुमारे १०००० ते १२००० शिवसैनिक मेळाव्यासाठी दुपारी चार वाजता वाजत गाजत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी रवाना होणार असल्याची माहिती आमदार-विभागप्रमुख सुनील प्रभू यांनी दिली.
संपूर्ण गोरेगाव विधानसभा मतदार संघातून आणि जोगेश्वरी,गोरेगाव येथील जवळच्या शाखांमधून मोठ्या संख्यने शिवसैनिक ट्रेनने वाजत गाजत शिवाजी पार्कवर मेळाव्याला जाणार आहेत.तर विभाग क्रमांक ३ मधून ६० बसेसमधून जेष्ठ नागरिक व महिला,शिवसैनिक मेळाव्याला जाणार असल्याची माहिती आमदार सुनील प्रभू यांनी दिली.
विभागक्रमांक १ मधून सुमारे १५० बसेस मधून १२००० शिवसैनिक,जेष्ठ नागरिक व महिला दुपारी ४ वाजता ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत,फटाके उडवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील मेळाव्याला रवाना झाले. तर अनेक जणांनी आम्ही ट्रेनने थेट
मेळाव्याला येणार असल्याचे कळवल्याची माहिती आमदार व विभागप्रमुख विलास पोतनीस यांनी दिली.
विभाग क्रमांक ४ अंधेरी पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या सात शिवसेना शाखांमधून सुमारे 3000 शिवसैनिक दुपारी ४ वाजता अंधेरी स्टेशनला जमणार आहेत.मग ट्रेनने दादरला उतरून पुढे जल्लोषात शिवाजी पार्क मेळाव्याला जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय कदम यांनी दिली.
विभाग क्रमांक ४ वर्सोवा विधानसभा मतदार संघातून आज दुपारी ४ च्या सुमारास सुमारे १००० शिवसैनिक अंधेरी स्टेशनला जमणार असून ट्रेन ने मग पुढे शिवाजी पार्क वर उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकण्यास जाणार आहे.तर जेष्ठ नागरिकांसाठी २ बसेस देखिल आहेत. वर्सोवा विधानसभा मतदार संघाचे उपविभागप्रमुख राजेश शेट्ये यांनी ही माहिती दिली.
विलेपार्ले विधानसभा मतदार संघातून ठाकरे गटाचे सुमारे १००० शिवसैनिक आज सायंकाळी ५ वाजता विलेपार्ले स्टेशनवर एकत्र येणार असून पुढे दादरला उतरून वाजत गाजत जल्लोषात शिवाजी पार्कवर जाणार असल्याची माहिती येथील शिवसेनेचे विधानसभा समन्वयक नितीन डीचोलकर यांनी दिली.