पालघर : राज्यभर डेंग्युच्या आजाराने घातलेल्या थैमानावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभाग सर्वकष पातळीवरून उपाययोजना आखण्याचे काम सुरु आहे. एकिकडे पाणी साचून ठेऊ नये अशा सूचना देत असताना दुसरीकडे मात्र, पालघर तहसील कार्यालयासमोर रेती उत्खनन करणाऱ्या सक्शन पंप बोटीवर पाणी साचले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.सर्वत्र डेंग्यू व मलेरीया मुक्त शहर, गाव, खेडी करण्यासाठी आरोग्य विभाग कसोशीने प्रयत्न करीत आहे. पालघर ग्रामीण रुग्णालयाचे मुख्यवैद्यकीय अधिक्षक डॉ. गावित यांनीही पालघर नगरपरिषदेसह संबंधीत शासीय कार्यालयाना खबरदारीचे उपाययोजना आखण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले. डेंग्युसदृश्य आजाराचे अनेक रुग्ण ग्रामीण रुग्णलायासह खाजी डॉक्टरांक्डे आढळून येत असून त्यांच्या रक्तातील प्लेटलेटसची संख्याही कमी कमी होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे डेंग्यूचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून प्रत्येक घरातील फुलदाण्या, कुंड्या इ. मधील पाणी नियमीत बदलणे, फ्रीज डि फ्रॉस्ट ट्रे, व एसी मधील पाणी काढून टाकणे, घराशेजारी रिकामी पाण्याच्या बाटल्या, करवंट्या, टायर, भंगारचे साहित्य इ. टाकाऊ वस्तू ठेऊ नये. यासाठी पंचायत समिती, जिल्हाधिकारी आरोग्य विभाग संपूर्ण जिल्ह्यात सर्वेक्षणासह लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर काही ग्रामस्थांना दुकानदारांना नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत. अशावेळी पालघर तहसिलदाराने कायदेशीर रेती उत्खनन करणाऱ्या सक्शन पंप बोटीवर कारवाई करून त्या तहसिल कार्यालयासमोर जप्त करून ठेवल्या ओहत. त्यामध्ये पावसाचे पाणी साचून मोठ्या प्रमाणात डासांच्या अळ्या निर्माण झाल्या असून हजारोंच्या संख्येने डासांची उत्पत्तीचे काम जोरात सुरू आहे. त्यामुळे पालघर पो. स्टे. व तहसिल कार्यालय रोज हजारो नागरीक कामानिमित्त येत असताना संध्याकाळी या डासांचे मोठमोठे पुंजके, जोरदार चावे घेत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहे. यासंदर्भात तहसिलदार चंद्रसेन पवार यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत चौकशी करतो असे सांगितले. (वार्ताहर)
तहसिल समोरच साठले डबके
By admin | Published: November 04, 2014 12:27 AM