राज्यभरात २१ दिवसांत २६ हजार वाहने जप्त, सव्वा कोटींंचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 07:21 AM2020-04-14T07:21:11+5:302020-04-14T07:21:38+5:30

निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची कडक कारवाई

Thousands of vehicles seized in 7 days across the state | राज्यभरात २१ दिवसांत २६ हजार वाहने जप्त, सव्वा कोटींंचा दंड वसूल

राज्यभरात २१ दिवसांत २६ हजार वाहने जप्त, सव्वा कोटींंचा दंड वसूल

Next

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू केलेल्या लॉकडाउनच्या काळात प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांची धरपकड सुरू असताना गेल्या २१ दिवसांत २६ हजार ७४७ वाहने जप्त करण्यात आली आहेत. तर १ कोटी ४३ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सोमवारी पहाटे चार वाजेपर्यंत आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांच्या दफ्तरी तब्बल ४० हजार २४२ गुन्हे नोंद झाले आहेत.

यात पुणे शहर (५१७८), सोलापूर शहर (३१९८ ), अहमदनगर (३७३९), पिंपरी-चिंचवड (३२८४) येथे सर्वाधिक गुह्यांची नोंद आहे. याच काळात राज्यभरात ५०९ व्यक्तींनी ‘होम क्वारंटाइन’चे आदेश धुडकावले. तसेच व्हिसा नियमांचे उल्लंघन करणाºया परदेशी व्यक्तींविरोधात १५ गुन्हे नोंदवण्यात आले. याच काळात अवैध वाहतूक प्रकरणी ९६८ गुन्हे नोंदवण्यात आले असून ३०९६ जणांना अटक करण्यात आली आहे. तर २६ हजार ७४७ वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. नागरिक विनाकारण बाहेर पडत असल्याने पोलिसांना कठोर पावले उचलावी लागत आहेत. तर पोलीस नियंत्रण कक्षात तब्बल ६५ हजार ५४५ तक्रारी समोर आल्या. यातील बहुतांश तक्रारी या कोरोना संशयित तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी संदर्भातील आहेत.
सोसायट्यांमध्येही गस्त वाढवली मुंबईत अनेक सोसायट्यांमध्ये रात्रीच्या सुमारास गप्पांच्या मैफिली भरत असल्याचे चित्र आहे. अशात पोलिसांनी अशा सोसायट्यांमध्येही गस्त वाढवली आहे. त्यामुळे पोलिसांची गाडी येताच अनेकांची पळापळ होत असल्याचे पाहावयास मिळते आहे.

मुंबईत ५ हजार गुन्हे
मुंबईत २० मार्च ते १२ मार्चपर्यंत
५ हजार ३२१ जणांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले असून २१५ जणांना अटक करत त्यांना जामिनावर सोडण्यात आले, तर ६६ जणांना नोटीस देऊन सोडले आहे.

Web Title: Thousands of vehicles seized in 7 days across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.