Corona Virus: कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही, माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 08:17 PM2021-10-06T20:17:48+5:302021-10-06T20:18:00+5:30

गणेशोत्सवातील बाधित रुग्ण आता लक्षणे दाखवत आहेत. तर उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्रउत्सवात दांडियाचे इनडोअर आयोजनाचे संकेत मिळत आहे. त्यातून परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.

threat of corona has not yet been averted, warns former health minister Deepak Sawant | Corona Virus: कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही, माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांचा इशारा

Corona Virus: कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही, माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांचा इशारा

Next

 - मनोहर कुंभेजकर
लोकमत न्यूजनेटवर्क

मुंबई: जगात सध्या कोरोना वाढत आहे.अमेरिकेत तर दि,30 सप्टेंबर पर्यंत 7 लाखांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले तर
गेल्या काही आठवडयात 2000 हुन अधिक मृत्यू दर दिवशी पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात व देशात चिंता वाढली आहे.मुंबईच्या पूर्व व पश्चिम उपनगरात हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.दररोज 20 ते 30 रुग्ण प्रत्येक वॉर्ड मध्ये मिळत आहेत.सर्व्हे होत नसल्याने तसेच आर.टी. पी.सी.आर.चाचणी टाळत असल्याचे मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय समाजात दिसून येत आहे.

गणेशोत्सवातील बाधित रुग्ण आता लक्षणे दाखवत आहेत. तर उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्रउत्सवात दांडियाचे इनडोअर आयोजनाचे संकेत मिळत आहे. त्यातून परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. कोविडचा धोका टळलेला नसून कोविड नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असे ठाम प्रतिपादन राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी लोकमतच्या माध्यमातून केले आहे.
अमेरिकेत रुग्ण संख्या वाढली असून मृत्यू देखिल मोठ्या प्रमाणावर होत आहे.यापासून आपण धडा घेऊन निदान मास्क वापरण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना होणे आवश्यक आहे.अमेरिकेत डेल्टा प्लस व्हेरिअंट मुळे 30 ते 50 वयोगटातील मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे आपण महाराष्ट्र व मुंबईची काळजी घेणे आवश्यक आहे. याबाबत आपण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वॉट्सअप वर माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले.

दोन लसींचे डोस घेतलेल्यांमध्ये मास्क न लावणे,गर्दीत जाण्याचे प्रकार वाढत आहे.त्यामुळे यावर मानसिकतेचा कायद्याचा दंडुका उगारणे आवश्यक आहे.त्यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याचे मत डॉ.दीपक सावंत यांनी व्यक्त केले. पूर्व -पश्चिम उपनगरात रेल्वेस्थानके,बसस्थानके आणि काल पासून नव्याने सुरू झालेल्या शाळा येथून सुपेरस्प्रेड होण्याची शक्यता आहे.ग्रामीण भागात विशेषतः सिंधुदुर्ग,रत्नागिरी,रायगड येथे वाड्या-वाड्यांवर खेळला जाणारा गरबा मुळे कोविड रुग्णांची लक्षणीय वाढ होऊ शकते. कारण मास्क विरहित गरबा आणि गेट टू गेदर हे कोविडच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देतील अशी भिती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे येणारी दिवाळी ही आपल्याला मास्कसह साजरी करावी लागेल. तसेच नव्याने सुरू होणाऱ्या शाळांची मधली सुट्टी टाळणे गरजेचे आहे. ठराविक तासांची शाळा असावी आणि त्यासाठी महानगर पालिकेच्या कोविड नियमांचे पालन होते की नाही यासाठी सक्तीने पालिकेने देखरेख ठेवली पाहिजे, असे मत डॉ.दीपक सावंत यांनी शेवटी व्यक्त केले.

Web Title: threat of corona has not yet been averted, warns former health minister Deepak Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.