मुंबई: कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आल्याने जानेवारी महिन्यात मुंबईत जेमतेम ७० हजार नागरिक होमक्वारंटाइन होते. मात्र गेल्या महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यापैकी बहुतांश रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नसल्याने असे रुग्ण होमक्वारंटाइन आहेत. त्यामुळे तीन आठवड्यांत घरातच उपचार घेणाऱ्या लोकांची संख्या दोन लाखांवर पोहोचली आहे. सध्या दोन लाख ११ हजार १०१ लोकं घरात, तर ५४१ नागरिक संस्थात्मक विलगीकरणात आहेत. मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आतापर्यंत ४५ लाख ५० हजार ९५६ नागरिकांनी होमक्वारंटाइनचा कालावधी पूर्ण केला आहे. जानेवारी २०२१ मध्ये कोरोनाचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे चित्र होते. मात्र फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. दररोज १७०० नवीन रुग्णांची नोंद होते आहे. सद्य:स्थिती १३ हजार ९४० बाधित रुग्णांपैकी आठ हजार ६४९ रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत, तर चार हजार ८४३ रुग्णांमध्ये लक्षणे आहेत.
गृहविलगीकरणासाठी अशी आहे अट?बाधित रुग्णाच्या संपर्कातील अतिजोखमीचे व्यक्तींना (घरात स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था) गृहविलगीकरणात ठेवण्यात येत होते. मात्र मे महिन्यापर्यंत रुग्णांची संख्या वाढू लागल्याने लक्षणे नसलेले रुग्णही रुग्णालयात दाखल होऊ लागले. यामुळे गरजू रुग्णाला खाटा उपलब्ध होत नव्हत्या. सध्या कोणतीही लक्षणे नसलेले रुग्ण, संशयित रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. तसेच गृहविलगीकरणात असलेल्या व्यक्ती बाहेर फिरताना आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जात आहे. संबंधित गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनाही होमक्वारंटाइन लोक नियम पळत असल्याकडे लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
आतापर्यंत संस्थात्मक विलगीकरणात १,६०,६५८ - बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या १५ हजार १८३ लोकांचा शोध पालिकेने गेल्या २४ तासांत घेतला आहे. यापैकी अतिजोखमीच्या गटातील दहा हजार १० हजार १०, तर कमी जोखमीच्या गटातील पाच हजार १७३ लोकांचा शोध घेण्यात आला आहे.
मार्च २०२० ते मार्च २०२१४५,५०,९५६ (क्वारंटाइन पूर्ण)