Join us

मुंबई विमानतळावरील विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी; ईमेलमुळे उडाली खळबळ

By मनीषा म्हात्रे | Updated: October 2, 2022 21:28 IST

रविवारी पहाटे ३ च्या सुमारास एमआयएएल कंपनीच्या फीडबॅकच्या ईमेलवर आलेल्या मेलमध्ये मुंबई विमानतळावरील एक विमान बॉम्बने उडवून देण्या येईल, असे म्हटले होते.

मुंबई : मुंबईविमानतळावरील विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी असलेला ईमेल आल्याने खळबळ उडाली होती. तपासात खोटी माहिती असल्याचे समोर येताच याप्रकरणी सहार पोलिसांनी अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रविवारी पहाटे ३ च्या सुमारास एमआयएएल कंपनीच्या फीडबॅकच्या ईमेलवर आलेल्या मेलमध्ये मुंबई विमानतळावरील एक विमान बॉम्बने उडवून देण्या येईल, असे म्हटले होते. यानंतर, तपास यंत्रणेकडून तत्काळ संबंधित विमान क्रमांकाची झडती घेण्यात आली. मात्र, त्यात काहीही आढळून आले नाही. दहशतवादी हल्ल्याची खोटी माहिती देत मुंबई विमानतळावरील सार्वजनीक शांततेचा भंग करुन भितीदायक वातावरण निर्माण केल्याप्रकरणी इंडिगो इंटरग्लोब कंपनीच्या फिर्यादीवरून अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी सहार पोलीस अधिक तपास करत आहे. 

टॅग्स :मुंबईविमानतळपोलिस