फोटो व्हायरल करण्याची धमकी

By admin | Published: April 12, 2017 02:58 AM2017-04-12T02:58:23+5:302017-04-12T02:58:23+5:30

तरुणीचे कपडे बदलतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत, तिच्याकडून २५ लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना वरळीत

The threat of viral photos | फोटो व्हायरल करण्याची धमकी

फोटो व्हायरल करण्याची धमकी

Next

मुंबई : तरुणीचे कपडे बदलतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत, तिच्याकडून २५ लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना वरळीत उघडकीस आली आहे. मुलुंडमधील एका व्यावसायिकाने हा प्रताप केला आहे. या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात विक्रम तुकाराम होले (४०) या व्यावसायिकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
वरळी परिसरात तक्रारदार तरुणी कुटुंबीयांसोबत राहाते. मे २०१५ मध्ये होलेने तिचे कपडे बदलतानाचे फोटो काढले. त्यानंतर, तरुणीला धमकाविण्यास सुरुवात केली. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत, तिच्याकडून शारीरिक संबंधासह २५ लाखांच्या खंडणीची मागणी केली.
भीतीने तरुणी त्याला टाळत होती. मात्र, तरीदेखील त्याने तिच्यामागे पैशांसाठी तगादा लावला होता. होले हा व्यावसायिक असून, मुलुंडचा रहिवासी आहे. गेली दोन वर्षे तो तिला ब्लॅकमेल करत होता. अखेर तिने दोन्ही गोष्टींना नकार दिल्यानंतर, त्याने तिच्या फेसबुक अकाउंटवर अश्लील चित्र आणि मेसेज पाठविण्यास सुरुवात केली. तरुणीने तत्काळ वरळी पोलीस ठाणे गाठून होलेच्या अत्याचाराला वाचा फोडली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी होलेविरुद्ध विनयभंग, खंडणी, धमकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरळी पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: The threat of viral photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.