धमकी देऊन तीन वर्षे अत्याचार

By admin | Published: January 5, 2017 04:21 AM2017-01-05T04:21:27+5:302017-01-05T04:21:27+5:30

कॉर्पोरेट सेक्टरमध्ये एकत्र काम करत असताना, तिची तरुणासोबत मैत्री झाली. याच मैत्रीतून ती त्याच्यासोबत जेवायला गेली. मात्र, तिथेच तिचा घात झाला.

Threatened for three years by threatening | धमकी देऊन तीन वर्षे अत्याचार

धमकी देऊन तीन वर्षे अत्याचार

Next

मनीषा म्हात्रे , मुंबई
कॉर्पोरेट सेक्टरमध्ये एकत्र काम करत असताना, तिची तरुणासोबत मैत्री झाली. याच मैत्रीतून ती त्याच्यासोबत जेवायला गेली. मात्र, तिथेच तिचा घात झाला. सहकर्मचाऱ्याने तिच्या जेवणात गुंगीचे औषध टाकून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर, तिचे व्हिडीओ आणि न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत, सलग तीन वर्षांपासून तिच्यावर मुंबईसह ठाणे परिसरातील विविध लॉज, हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तिच्या असहायतेचा फायदा उचलत, त्याने बेड शेअर केल्यामुळे, त्याच्या अन्य दोन मित्रांनीही तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार पवईत उघडकीस आला आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा पुढील तपासासाठी वर्तकनगर पोलिसांकडे वर्ग केल्याची माहिती ‘लोकमत’ला मिळाली आहे.
भार्इंदर येथील रहिवासी असलेली २९ वर्षीय नेहा (नावात बदल) कुटुंबीयांसोबत राहाते. उच्चशिक्षित असलेल्या नेहाला २०१२ मध्ये पवईत एका कॉर्पोरेट आॅफिसमध्ये नोकरी लागली. त्याच ठिकाणी तिची ओळख गणपत पुरोहित या तरुणासोबत झाली. एप्रिल २०१३ मध्ये पुरोहितने कामावरून सुटल्यानंतर सोबत जेवायला जाऊ, असे सांगितले. ओळखीचाच सहकारी असल्याने तिने त्याला होकार दिला. अशात ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पीटलशेजारी असलेल्या एका हॉटेलमध्ये त्यांनी जेवणाचा बेत उरकला.
मात्र, याच वेळी पुरोहितने तिच्या जेवणात गुंगीचे औषध दिल्याने ती बेशुद्ध झाली. पुरोहितने आधीच बुक केलेल्या रूममध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर, त्याचे व्हिडीओ आणि न्यूड फोटो त्याने मोबाइलमध्ये सेव्ह केले होते. नेहा शुद्धीवर आल्यानंतर, त्याने हे व्हिडीओ आणि तिचे न्यूड फोटो तिला दाखविले. कुणाकडे याबाबत वाच्यता केल्यास, जिवे मारण्याची धमकी दिली. या भीतीने नेहाला धक्का बसला. नेहाच्या याच भीतीचा फायदा घेत, पुरोहितने तिच्यावर अत्याचार सुरू केले. जानेवारी २०१५ मध्ये पुरोहितने नेहाला सहार इंटरनॅशनल येथील एका हॉटेलमध्ये बोलावले.
बदनामीच्या भीतीने नेहा तेथे गेली, तेव्हा आधीपासून त्याचे दोन मित्र रूमवर होते. पुरोहितसह त्या दोघांनीही तिच्यावर अत्याचार
केले. घाबरलेल्या नेहाने नोकरी सोडली. घरातून बाहेर निघण्यासही ती घाबरत होती. मात्र, पुरोहितने
त्या प्रकारानंतरही फोटो व्हायरल करण्याची धमकी देत, तिच्यावर बलात्कार केला. (प्रतिनिधी)

Web Title: Threatened for three years by threatening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.