मुलगी आणि विद्यार्थिनीच्या गळ्यावर चाकू ठेवून धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:07 AM2021-01-22T04:07:07+5:302021-01-22T04:07:07+5:30

खासगी शिकवणी घेणाऱ्या विवाहितेची पोलिसांत धाव, कफपरेड येथील घटना मुलगी आणि विद्यार्थिनीच्या गळ्यावर चाकू ठेवून धमकी खासगी शिकवणी घेणाऱ्या ...

Threatening the girl and the student with a knife to the neck | मुलगी आणि विद्यार्थिनीच्या गळ्यावर चाकू ठेवून धमकी

मुलगी आणि विद्यार्थिनीच्या गळ्यावर चाकू ठेवून धमकी

Next

खासगी शिकवणी घेणाऱ्या विवाहितेची पोलिसांत धाव, कफपरेड येथील घटना

मुलगी आणि विद्यार्थिनीच्या गळ्यावर चाकू ठेवून धमकी

खासगी शिकवणी घेणाऱ्या विवाहितेची पोलिसांत धाव, कफपरेड येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : खासगी शिकवणी घेणाऱ्या २४ वर्षीय महिलेच्या मुलीला आणि तिच्याकडे शिकवणीसाठी येणाऱ्या विद्यार्थिनीच्या गळ्यावर चाकू ठेवून धमकाविल्याचा प्रकार कफपरेडमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी कफपरेड पोलिसांनी अनोळखी तरुणाविरुद्ध गुन्हा नोंद करत अधिक तपास सुरू केला.

तक्रारदार या कफपरेड परिसरातील आंबेडकरनगर येथे कुटुंबियासोबत राहण्यास असून, खासगी शिकवणी घेतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १८ जानेवारी रोजी त्यांची ८ वर्षीय मुलीला येथीलच एका गल्लीत अडवून, तोंडाला हात लावून चाकूच्या धाकात धमकावले. पण मुलीने त्याच्या तावडीतून पळ काढत घर गाठले. घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर सायंकाळी शिकवणी सुटल्यावर घरी निघालेल्या विद्यार्थिनींपैकी एकीला अडवून तशाच प्रकारे धमकावले. यावेळी त्या विद्यार्थिनीचा फोटोदेखील त्याच्याकडे होता. त्यानंतर त्यांच्या पतीने परिसरात आरोपीचा शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. अखेर महिलेने कफपरेड पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, दोन्ही मुलींनी केलेल्या वर्णनावरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Threatening the girl and the student with a knife to the neck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.