Join us

एकतर्फी प्रेमातून महिलेला धमक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 5:12 AM

‘तुझे अश्लील फोटो इंटरनेटवर टाकेन... तुझ्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकेन, तुझ्या आईला ठार मारेन..’ अशा स्वरूपाच्या धमकीच्या कॉलने नामांकित बँकेतील महिला कर्मचारी घाबरली.

मुंबई : ‘तुझे अश्लील फोटो इंटरनेटवर टाकेन... तुझ्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकेन, तुझ्या आईला ठार मारेन..’ अशा स्वरूपाच्या धमकीच्या कॉलने नामांकित बँकेतील महिला कर्मचारी घाबरली. तिने मित्राचा आधार घेतला. त्याच्यासह पोलीस ठाण्यात धाव घेतली. धक्कादायक बाब म्हणजे या धमक्यांमुळे घाबरलेल्या तरुणीचा सहवास मिळविण्यासाठी तिच्याच मित्राने हा प्रताप केल्याचे उघडझाले. त्याचे महिलेवर एकतर्फीप्रेम होते. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष १२ने अभिजित बच्चालाल सिंग या कर्मचाºयाला बेड्या ठोकल्या आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालाड पूर्र्वेच्या पठाणवाडीत राहणारा सिंग हा नामांकित बँकेच्या वीरा देसाई शाखेत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो. तर तक्रारदार तरुणी सुमन (नावात बदल) ही कांदिवली शाखेत कार्यरत आहे. गेल्या काही दिवसांपासून तिला धमकीचे फोन येत होते. दोघेही चांगले मित्र असून सिंगचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. मात्र सुमनला हे सांगितल्यानंतर दोघांची मैत्री तुटेल या भीतीने त्याने तिला याबाबत सांगितले नाही. सुमनचा सहवास मिळविण्यासाठी त्याची धडपड सुरू झाली. तिच्या सहवासासाठी त्याने तिला धमक्या देऊन घाबरविण्याचे ठरविले. ‘तुझ्या आईला ठार मारू, तुझ्या अंगावर अ‍ॅसिड फेकू तसेच तुझे फोटो व्हायरल करू, अशा आशयाच्या धमक्यांमुळे तिने दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या कक्ष १२कडून सुरू होता.सुमनने धमकीचे कॉल आॅडिओ आणि संबंधित क्रमांक पोलिसांना दिले होते. त्यावरून सिंग ज्या पीसीओवरून कॉल करायचा त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज त्यांनी मिळविले. सिंग त्यात दिसत होता मात्र हातात छत्री असल्याने त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. अखेर त्याच्या चालण्याच्या आणि बोलण्याच्या विशिष्ट पद्धतीमुळे गुन्हे शाखेच्या अधिकाºयांचा त्याच्यावरील संशय बळावला. त्यांनी सिंगची उलट तपासणी सुरू केली.अखेर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. एकतर्फी प्रेमातून त्याने हा प्रताप केल्याचे पोलिसांना सांगितले. प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील जाधव, सचिन गवस, सपोनि विक्रमसिंग कदम, अतुल आव्हाड आणि पथकाने अवघ्या ४८ तासांत गुन्हा उघडकीस आणला.कशासाठी... तर सहवासासाठी!सिंगने असे का केले याबाबत पोलिसांनी त्याला विचारणा केली. तेव्हा मी जेव्हा सुमनला फोन करायचो तेव्हा ती घाबरायची. मला बोलवायची आणि घडलेला प्रकार सांगायची. फोन केल्याने मला तिचा सहवास भेटायचा, ज्यासाठी मी हे सर्व केल्याचे त्याने तपास अधिकाºयांना सांगितले.

टॅग्स :गुन्हामुंबई