कारवाई करणाऱ्या पथकाला धमक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 04:28 AM2018-06-29T04:28:22+5:302018-06-29T04:28:24+5:30

प्लॅस्टिकचा वापर करणाºया ग्राहक व दुकानदारांवर कारवाई करण्यास जाणाºया महापालिकेच्या पथकाला धमकावण्यात येत आहे. बºयाच वेळा नागरिकांबरोबर वादाचे प्रसंग

Threats to the squad to take action | कारवाई करणाऱ्या पथकाला धमक्या

कारवाई करणाऱ्या पथकाला धमक्या

Next

मुंबई : प्लॅस्टिकचा वापर करणाºया ग्राहक व दुकानदारांवर कारवाई करण्यास जाणाºया महापालिकेच्या पथकाला धमकावण्यात येत आहे. बºयाच वेळा नागरिकांबरोबर वादाचे प्रसंग उद्भवत असल्याने कारवाई करणारे निरीक्षक हैराण झाले आहेत. त्यामुळे या मोहिमेवर जाताना संरक्षण पुरविण्याची मागणी या कर्मचाºयांनी केली आहे.
राज्यभरात २३ जूनपासून प्लॅस्टिकबंदी लागू झाल्यानंतर मुंबई महापालिकेनेही कारवाईला सुरुवात केली. यासाठी नियुक्त विशेष पथकाने गुरुवारी कारवाईच्या पाचव्या दिवसापर्यंत तब्बल १५ लाख ८० हजारांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईदरम्यान १३९०.३४४ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. मात्र, प्लॅस्टिकबंदीचे नियम मोडणाºयांविरोधात कारवाई करणाºया अधिकाºयांना नागरिक, व्यापारी घेराव घालून या निरीक्षकांनाच दटावत असल्याचे समोर आले आहे.
भायखळा येथील दुकानांवर कारवाई करण्यास गेलेल्या पथकाला या रोषाचा सामना करावा लागला. ही मोहीम सुरू ठेवल्यास परिणाम वाईट होतील, अशी धमकीच संतप्त जमावाने पालिकेच्या पथकाला दिली. या घटनेमुळे निरीक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे कारवाईदरम्यान सुरक्षा मिळावी, अशी मागणी काहींनी प्रशासनाकडे केल्याचे एका अधिकाºयाने सांगितले. निरीक्षकांच्या या मागणीबाबत विचार सुरू असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.

दिवस तपासणी दंड जप्त प्लॅस्टिक
२३ जून ६० ६०००० २७ किलो
२४ जून ८६७ ३९०००० ६१७ किलो
२५ जून १७०८ ३१५००० १३८.१०० किलो
२६ जून ५८७९ ४९५००० ३२४.२३४ किलो
२७ जून ६१६१ ३२०००० २८४.१० किलो
एकूण १४,६७५ १५,८०,००० १३९०.३४४ किलो

Web Title: Threats to the squad to take action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.