Join us

कुरार मोबाइल वाद हत्याप्रकरणी तिघांना अटक

By admin | Published: May 01, 2017 7:04 AM

मालाडमध्ये मोबाइल दुरुस्तीच्या वादातून रोहित सहानी (३०) नामक तरुणाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी कुरार

मुंबई : मालाडमध्ये मोबाइल दुरुस्तीच्या वादातून रोहित सहानी (३०) नामक तरुणाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी कुरार पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिघांना अटक केली आहे. मात्र, या प्रकारामुळे कुरार परिसरात खळबळ उडाली आहे. मालाडच्या कुरार परिसरातच शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. याची माहिती स्थानिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानुसार, कुरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, पुढील कारवाई केली. फैजल, असिफ आणि अजीम अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे असल्याची माहिती कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लिंबन्ना व्हनमाने यांनी दिली. यातील फैजल हा मुख्य आरोपी आहे. मृत सहानीशी मोबाइल दुरुस्तीवरून फैजलचे वाद सुरू होते. फैजलच्या भिवंडी परिसरातून मुसक्या आवळण्यात आल्या, तर त्याचे दोन साथीदार टेम्पो आणि पाणीपट्टी चालक असून, त्यांना कुरार परिसरातूनच शनिवारी रात्री उशीरा अटक करण्यात आल्याचे कुरार पोलिसांकडून सांगण्यात आले. सहानी हा मूळचा पश्चिम बंगालचा राहणारा होता. सहानीचा मृतदेह शव विच्छेदनानंतर त्याच्या गावी पाठवण्यात आला. त्याचा मृत्यू हा शरीरात झालेल्या अंतर्गत दुखापतीमुळे झाल्याचे, त्याच्या शवविच्छेदन अहवालात उघड झाले आहे. (प्रतिनिधी)