नवी मुंबई : खंडणीसाठी व्यापा:याला धमकावणा:या तिघांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून एक बनावट पिस्तूल देखील जप्त करण्यात आले आहे.
नेरूळ येथे राहणा:या सुधाकर एकनाथ पाटील (55) यांच्यासोबत 17 जुलै रोजी हा प्रकार घडला होता. अनिल आनंद फडके या व्यक्तीने त्यांना फोन करून सानपाडा येथील दत्त मंदिराजवळ बोलवले होते. त्यानुसार पाटील हे तेथे आले असता फडके याने साथीदारांच्या मदतीने त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवले. त्यानंतर पिस्तुलाचा धाक दाखवून पाच लाख रुपयांची मागणी केली होती. तसेच को:या स्टँप पेपरवर त्यांच्या सह्या देखील घेतल्या होत्या. या प्रकारानंतर एका सोनाराकडून पाच लाख रुपये घेऊन ते आनंद फडके याला दिल्यानंतर पाटील यांची सुटका झाली होती. परंतु उर्वरीत 47 लाख रुपयांच्या मागणीसाठी अनिल फडके हा सातत्याने पाटील यांना फोनवरुन संपर्क साधत होता. त्यामुळे पाटील यांनी यासंदर्भात खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पोलिस आयुक्त के. एल. प्रसाद व गुन्हे शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाने तपासाला सुरुवात केली. अखेर अनिल फडके व त्याचे साथीदार अन्वर हुसेन इब्राहीम शेख, कपील भरत बाबर यांनाही अटक करण्यात आली आहे.
वाशी रेल्वे स्थानक व पवई येथून या सर्वाना अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे, सुनिल बाजारे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. अनिल फडके हा देखिल इस्टेट एजंट असून पाटील हे श्रीमंत असल्याची माहिती त्याला होती. त्यानुसार साथीदारांसोबत मिळून त्याने खंडणीचा बेत आखल्याचे पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी सांगितले. यासाठी त्यांनी वापरलेले बनावट पिस्तूल व कार (एमएच- 46- डब्ल्यु 7333) देखील जप्त केली आहे. अटक केलेल्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)