Join us

वर्क फ्रॉम होमच्या नादात लागला साडे तीन लाखांचा चुना; बघा - नेमकं काय घडलं? 

By मनीषा म्हात्रे | Published: October 02, 2022 8:22 PM

डोंगरी परिसरात राहणाऱ्या ३३ वर्षीय अफशा वर्क फ्रॉम होमच्या शोधात असताना ०८ सप्टेंबर रोजी त्यांना फेसबुकवर ऑनलाईन नोकरीसाठी एक जाहिरात दिसली. यात एक लिंक देण्यात आली होती.

मुंबई : विविध शॉपिंग संकेतस्थळांवरील वेगवेगळे प्रोडक्ट्स खरेदी करून ते कंपनीतील मर्चंट रिटेलरला विकून, त्याबदल्यात चांगले कमिशन देण्याच्या नावाखाली डोंगरीतील गृहिणीची साडे तीन लाखांना फसवणूक झाली आहे. वर्क फ्रॉम होमच्या नादात त्यांचे खाते रिकामे झाले आहेत. याप्रकरणी डोंगरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

डोंगरी परिसरात राहणाऱ्या ३३ वर्षीय अफशा वर्क फ्रॉम होमच्या शोधात असताना ०८ सप्टेंबर रोजी त्यांना फेसबुकवर ऑनलाईन नोकरीसाठी एक जाहिरात दिसली. यात एक लिंक देण्यात आली होती. अफशा यांनी जाहिरातीमध्ये दिलेली लिंक ओपन करून त्यात आपली माहिती भरली. दुसऱ्या दिवशी त्यांना टेलिग्राम अॅपवरून आलेल्या संदेशात ॲमेझॉन ऑनलाईन शॉपींगचा लोगो असलेल्या लिंकवरून, कंपनीचे वेगवेगळे प्रोडक्ट खरेदी करून ते कंपनीतील मर्चंट रिटेलर यांना विका. ते तुम्हाला त्याबदल्यात कमिशन देतील. असे नमूद होते.

त्यांनीही जास्तीच्या कमिशनसाठी लॅपटॉप, महागडे घड्याळ, गोल्ड कॉईन, सन ग्लासेस, स्टेज लाइट, कार्पेट, कॅमेरा अशा महागड्या प्रोडक्टची खरेदी केली. यामध्ये जवळपास ३ लाख ५७ हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, कमिशन मिळत नसल्याने त्यांना संशय आला. यात, फसवणूक झाल्याची खात्री पटताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.  

टॅग्स :धोकेबाजीगुन्हेगारीपोलिस