साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 06:08 AM2024-11-26T06:08:20+5:302024-11-26T06:08:43+5:30

१ हजार ६७२ कोटींची थकबाकी, करनिर्धारण व संकलन विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात ६ हजार २०० कोटींचे कर संकलन उद्दिष्ट निश्चित केले आहे.

Three and a half thousand properties will be confiscated; Big action by Mumbai Municipal Corporation due to non-payment of taxes | साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई

साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई

मुंबई - पालिका प्रशासनाने सातत्याने आवाहन आणि पाठपुरावा करूनही मालमत्ता कर न भरल्यामुळे पालिकेने तब्बल ३ हजार ६०५ मालमत्ताधारकांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. या मालमत्तांमध्ये भूखंड, निवासी-व्यावसायिक इमारती, व्यावसायिक-औद्योगिक गाळे आदींचा समावेश आहे.

पश्चिम उपनगरांत सर्वाधिक म्हणजे १ हजार ७६७, शहर विभागात १ हजार २३२ तर पूर्व उपनगरांतील ६०६ मालमत्तांवर जप्ती आणि अटकावणीची कारवाई केली आहे. या ३ हजार ६०५ मालमत्ताधारकांकडे एकूण १ हजार ६७२ कोटी ४१ लाखांची कर थकबाकी आहे. 

दिलेल्या मुदतीत करभरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ता कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना पालिकेने कलम २०३ अन्वये जप्तीची नोटीस बजावली आहे. मुदतीत करभरणा न केल्यास अधिनियमांतील तरतुदीनुसार संबंधित मालमत्तेवर आधी जप्ती आणि मग लिलाव करण्यात येणार आहे. 

नाही तर दंडात्मक कारवाई 

वर्ष २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता करभरणा करण्याच्या पहिल्या सहामाहीची अंतिम  मुदत शनिवार, १३ डिसेंबर आहे. मालमत्ताधारकांनी या अंतिम देय मुदतीपूर्वी करभरणा न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मुदतपूर्व मालमत्ता करभरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे 

कर भरण्यासाठी पाठपुरावा केलेल्या ‘टॉप टेन’ मालमत्ताधारकांची यादी

मेसर्स सेजल शक्ती रिॲल्टर्स (एफ उत्तर विभाग) - १४ कोटी ८५ लाख ९९ हजार २०८ रुपये
लक्ष्मी कमर्शियल प्रीमायसेस (जी उत्तर विभाग) - १४ कोटी २९ लाख ९० हजार १२१ रुपये
मेसर्स एशियन हॉटेल्स लिमिटेड (के पूर्व विभाग) - १४ कोटी १८ लाख ९२ हजार ३०२ रुपये
सहारा हॉटेल्स (के पूर्व विभाग) - १३ कोटी ९३ लाख ५० हजार ९६३ रुपये
मेसर्स न्यूमॅक ॲन्ड रिओडर जे. व्ही. (एफ उत्तर विभाग) - १३ कोटी ४५ लाख ४४ हजार ८१२ रुपये
 मेसर्स फोरमोस्ट रिॲल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड (एच पूर्व विभाग) - १२ कोटी ५० लाख ९० हजार १३९ रुपये
श्री साई पवन को-ऑपरेटिव्ह हाैसिंग सोसायटी (के पश्चिम विभाग) - ११ कोटी ६९ लाख ४५ हजार ०५८ रुपये
कमला मिल्स लिमिटेड (जी दक्षिण विभाग) - ११ कोटी ४७ लाख २५ हजार १३० रुपये
 श्री एल. एन. गडोदिया ॲन्ड सन्स लिमिटेड (एच पश्चिम विभाग) - ११ कोटी ४४ लाख ९७ हजार ५८२ रुपये
मोहित कन्स्ट्रक्शन कंपनी (के पश्चिम विभाग) - ११ कोटी २६ लाख ५६ हजार २६७ रुपये

Web Title: Three and a half thousand properties will be confiscated; Big action by Mumbai Municipal Corporation due to non-payment of taxes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.