लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या घडीला केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवास करण्याची मुभा आहे. उपनगरीय रेल्वेतून दररोज साडेतीन लाख अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करत आहेत.यामध्ये पश्चिम रेल्वेतून सरासरी ३ लाख ३०, तर मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेतून सरासरी १.५० लाख कर्मचारी प्रवास करत आहेत. यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकारमधील कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी आणि खासगी तसेच सहकारी बँकांमधील कर्मचाºयांना समावेश आहे.सोशल डिस्टन्सिंगचे पालनरेल्वे स्थानक परिसरात आणि रेल्वेत सोशल डिस्टन्सिंग पाळायला हवे. रेल्वेची प्रवासी क्षमता १२०० आहे, पण सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी केवळ ७०० जणांना परवानगी देण्यात आली आहे.
कोणाला आहेप्रवासाची मुभाच्सध्याच्या घडीला केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांनाच लोकल प्रवास करण्याची मुभा आहे.च्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, पालिका कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, बँक कर्मचारी(खासगी आणि सहकारी बँक कर्मचारीही) यांचा समावेश आहे.कोणाला प्रवासाचीमुभा नाहीउपनगरीय रेल्वेने सामान्य प्रवासी, लोक यांना प्रवासाची मुभा नाही.ही सेवा राज्य सरकारने परवानगी दिलेल्या अत्यावश्यक कर्मचाºयांसाठी आहे.राज्य सरकारने विनंती केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांना रेल्वेने प्रवासाची मुभा आहे. प्रवाशांच्या वाढत्या संख्येनुसार गाड्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. तसेच नियमित सेवा सुरू करण्याबाबत सरकारच्या सूचना आल्यानंतर त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
च्रेल्वे प्रवासाची मुभा असलेल्या कर्मचाºयांना ओळखपत्र आवश्यकच्राज्य सरकारने दिलेलेक्यू आर कोड किंवा ईपास आवश्यकच्प्रवास करणारी व्यक्ती वैद्यकीयदृष्ट्या सदृढ असावीच्प्रवास करणारे कंटेन्मेंट झोनमधून आलेले नसावेतच्रेल्वे प्रवासात सोशल डिस्टन्सिंग पाळावेच्मास्क परिधान करावे