कस्टमच्या सहाय्यक आयुक्तासह तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 04:46 AM2018-02-02T04:46:24+5:302018-02-02T04:47:37+5:30
दंडाची रक्कम कमी करण्याच्या मोबदल्यात हिरे व्यापा-याकडून दोन लाखाची लाच घेणा-या केंद्रीय सीमा शुल्क (कस्टम) विभागाच्या सहाय्यक आयुक्तासह तिघांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी अटक केली.
मुंबई : दंडाची रक्कम कमी करण्याच्या मोबदल्यात हिरे व्यापा-याकडून दोन लाखाची लाच घेणाºया केंद्रीय सीमा शुल्क (कस्टम) विभागाच्या सहाय्यक आयुक्तासह तिघांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी अटक केली.
सहाय्यक आयक्त कालीचरण पंडा, हिरे व्यापारी तकाक्षी कारूडा आणि व्यवसायाने चार्टड अकाऊंटंट असणारा संजीव मल्होत्रा, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
दक्षिण मुंबईतील बेलार्ड पियार्ड येथील कस्टमच्या कार्यालयात छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. कस्टमने आकारलेल्या दंडाची रक्कम कमी करण्यासाठी कारूडा आणि मल्होत्रा यांनी सहाय्यक आयुक्त असणाºया कालीचरणशी संपर्क साधला होता.
दोन लाखात याबाबतचा सौदा ठरला होता. एका त्रयस्थ व्यक्तीने याबाबतची माहिती सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळविली. त्यानंतर गुरुवारी सापळा रचून हा व्यवहार होत असताना तिघांना अटक करण्यात आली.