Join us

अजित पवार गट पदाधिकारी हत्या प्रकरणात तिघांना अटक; राजकीय वैमनस्यातून काढला काटा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 5:18 AM

राजकीय प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबाचे निकटवर्तीय असल्याने ते यात अडथळा ठरत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे भायखळा विधानसभा तालुकाध्यक्ष सचिन ऊर्फ मुन्ना कुर्मी (४६) यांच्या हत्येप्रकरणी भायखळा पोलिसांनी आनंदा ऊर्फ अन्या काळे (३९), विजय ऊर्फ पप्या काकडे (३४) आणि प्रफुल्ल पाटकर (२६) या त्रिकुटाला अटक केली आहे. राजकीय पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय आहे.

घोडपदेवमधील अनंत गणपत पवार लेनवर शतपावलीसाठी गेलेले सचिन कुर्मी यांची दुचाकीवरून आलेल्या अन्या, पप्या आणि प्रफुल्ल यांनी धारधार शस्त्रांनी भोसकून शुक्रवारी मध्यरात्री हत्या केली. पोलिसांनी तीन मारेकऱ्यांना अटक केली. सत्तेत सहभागी असलेल्या पक्षाच्या माथाडी कामगार विभागाचा पदाधिकाऱ्याने या त्रिकुटाच्या मदतीने हत्येचा कट आखल्याचा माहिती सूत्रांनी दिली. तो नगरसेवकपदाच्या उमेदवारी प्रयत्न करत आहे. 

यातच राजकीय प्रतिस्पर्धी सचिन कुर्मी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबाचे निकटवर्तीय असल्याने ते यात अडथळा ठरत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :गुन्हेगारी