Join us

तीन बोडो अतिरेकी नवी मुंबईतून जेरबंद

By admin | Published: April 05, 2015 2:21 AM

राज्याच्या दहशदवादविरोधी पथकाने शुक्रवारी नवी मुंबई परिसरातून तीन बोडो अतिरेक्यांना अटक केली.

मुंबई : राज्याच्या दहशदवादविरोधी पथकाने शुक्रवारी नवी मुंबई परिसरातून तीन बोडो अतिरेक्यांना अटक केली. आसाम येथे झालेल्या हत्याकांडात या अतिरेक्यांचा मोठा रोल असून, त्यांच्यावर आसाम राज्यात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती एटीएसने दिली आहे.डिसेंबर २०१४ला नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रन्ट आॅफ बोडो लँड या संघटनेने आसाम सरकारसमोर काही मागण्या ठेवल्या होत्या. मात्र सरकारकडून त्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने या संघटनेच्या सदस्याने संपूर्ण आसाममध्ये मोठा हिंसाचार घडवून आणला होता. यामध्ये ७४ निष्पापांना आपला प्राण गमवावा लागला होता. तेव्हापासून या आरोपींवर आसाममध्ये अनेक गुन्हे दाखल होते. आसाममधील काही अतिरेकी वेषांतर करून विविध राज्यांत वावरत आहेत. दरम्यान, नवी मुंबईतील तळोजा परिसरात असलेल्या कोल्ड स्टोरेजमध्ये गेल्या काही दिवसांपासून हे तीन अतिरेकी काम करीत होते. एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी शुक्रवारी सापळा रचून बिसोअली अनसई सोंगा (२२) स्वामकॉर बासूमटरी (२२) आणि पुर्णो नार्जरी (२१) यांना अटक केली.