राज्यपाल कोश्यारी यांच्यावरील तीन पुस्तकांचे सोमवारी होणार प्रकाशन
By नारायण जाधव | Published: September 4, 2022 11:36 PM2022-09-04T23:36:58+5:302022-09-04T23:38:06+5:30
कोश्यारी आपल्या महाराष्ट्रातील राज्यपाल पदाच्या कार्यकाळापैकी ३ वर्षे पूर्ण करीत आहेत.
सोमवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या महाराष्ट्रातील राज्यपाल पदाच्या कार्यकाळापैकी ३ वर्षे पूर्ण करीत आहेत. यानिमित्त उद्या (दि. ५) राजभवन मुंबई येथे राज्यपालांच्या कार्याविषयी तीन पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे.
प्रकाशन सोहळ्याला उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, नागालँडचे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य व लोकमत समूहाचे अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
खालील पुस्तकांचे होणार प्रकाशन :
१. राज्यपालांच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीवर आधारित कॉफी टेबल पुस्तक 'त्रैवार्षिक अहवाल : भगत सिंह कोश्यारी' (राजभवनातर्फे प्रकाशित अहवाल)
२. 'लोकनेता भगत सिंह कोश्यारी' - रविकुमार आराक लिखित चरित्रात्मक मराठी पुस्तक
तसेच
३. 'राज्यपाल के रूप में श्री भगत सिंह कोश्यारी के चुनिंदा भाषण' संकलन - संपादन डॉ मेधा किरीट
सदर कार्यक्रम सोमवारी दुपारी ४.०० वाजता दरबार हॉल, राजभवन येथे होणार आहे.