Join us

उत्तरपत्रिका फेरफारप्रकरणी विद्यार्थ्यासह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 5:13 AM

मुंबई : मुंबई विद्यापीठातील उत्तरपत्रिकांच्या फेरफारप्रकरणी विद्यापीठाच्या तीन कर्मचाऱ्यांसह एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला वांद्रे पोलिसांनी अटक केली. संदीप पालकर, प्रवीण ...

मुंबई : मुंबई विद्यापीठातील उत्तरपत्रिकांच्या फेरफारप्रकरणी विद्यापीठाच्या तीन कर्मचाऱ्यांसह एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला वांद्रे पोलिसांनी अटक केली. संदीप पालकर, प्रवीण बागल, संगमेश कांबळे, सय्यद नदीम अहमद निजामुद्दीन अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांना १९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. सय्यद नदीम महाविद्यालयीन विद्यार्थी आहे.गरवारे इन्स्टिट्यूटच्या ‘मास्टर आॅफ सबस्टेनेबल डेव्हलपमेंट’ या अभ्यासक्रमांतर्गत ‘युनिट आॅपरेशन अँड प्रोसेस’ या विषयाची परीक्षा गेल्या आठवड्यात होती. त्याच्या सीलबंद उत्तरपत्रिका कपाटात ठेवल्या होत्या. त्या तिघांनी चोरल्या आणि निजामुद्दीनला दिल्या. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी बागल, पालकर, कांबळे या तीन कर्मचाºयांना ताब्यात घेत चौकशी केली. तेव्हा आठवडाभरापूर्वी ज्या संबंधित अभ्यासक्रमाची परीक्षा निजामुद्दीनने दिली होती, त्यानेच उत्तरपत्रिकेत फेरफार करण्याचे काम दिले, त्यासाठी तो पैसे देणार होता, अशी कबुली या तिघांनी दिली.

टॅग्स :मुंबई विद्यापीठपरीक्षा