विरारमध्ये तीन दलित भावंडांना जबर मारहाण
By admin | Published: October 13, 2015 03:40 AM2015-10-13T03:40:03+5:302015-10-13T03:40:03+5:30
वसई-विरार महानगरपालिकेच्या प्रभाग ‘क’ चे सभापती पांडुरंग इंगळे यांच्या तीन मुलांना ३० ते ४० तरुणांच्या गटाने सोमवारी जबर मारहाण केली.
वसई (ठाणे) : वसई-विरार महानगरपालिकेच्या प्रभाग ‘क’ चे सभापती पांडुरंग इंगळे यांच्या तीन मुलांना ३० ते ४० तरुणांच्या गटाने सोमवारी जबर मारहाण केली. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून, मुख्य आरोपी गौरव राऊतसह अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
मारहाणीत प्रसन्नजित, सागर व चेतन इंगळे हे तिघे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. विरार पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शेट्टी अन्ना उर्फ शेलवम, नॉनी उर्फ सागर यशवंत कोरेगावकर आणि संतोष सोनावणे अशा तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना मंगळवारी वसई न्यायालयात हजर केले जाणार आहे.
विरार (पूर्व) भागात राहणारे पांडुरंग इंगळे यांच्या तीन मुलांपैकी एक जण मित्रांसमवेत बोलत असताना, काही तरुणांनी दुपारी जातीवाचक शिव्या देऊन त्याला जबर मारहाण केली. त्याचा जाब विचारण्यास त्याचे दोघे भाऊ गेले असता त्यांनाही तरुणांच्या टोळक्याने जबर मारहाण केली. (प्रतिनिधी)