१८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी तीन दिवसीय विशेष लसीकरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:06 AM2021-06-05T04:06:24+5:302021-06-05T04:06:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाविकास आघाडी सरकार व मुंबई महानगरपालिका यांनी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण ...

A three-day special vaccination campaign for citizens in the age group of 18 to 44 years | १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी तीन दिवसीय विशेष लसीकरण मोहीम

१८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी तीन दिवसीय विशेष लसीकरण मोहीम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महाविकास आघाडी सरकार व मुंबई महानगरपालिका यांनी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली खरी, परंतु ग्लोबल टेंडरमधील आगाऊ भरणा करणार नसल्याच्या अटीमुळे अनेक कंपन्यांनी लस देण्यास असमर्थता दर्शवली आहे. मुंबईतील ४५पेक्षा जास्त वयोगटासाठी केंद्र सरकारकडून पाठविण्यात आलेल्या लसी आपापल्या जिल्ह्यांत व बॉलिवूडमधील लोकांसाठी वापरण्याचा प्रकारसुद्धा ठाकरे सरकारमधील मंत्र्यांकडून केला जात आहे, असा आरोप मुंबई भाजपचे प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकार व मुंबई महापालिकेच्या निष्क्रीय व हेकेखोर कारभारामुळे १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत. त्यांच्यासाठी दि. ४, ५, ६ जून असे तीन दिवसीय विशेष लसीकरण मोहिमचे आयोजन केले असून, या गटातील किमान पाच हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती आमदार भातखळकर यांनी दिली.

अपोलो हॉस्पिटल व स्पंदन सामाजिक संस्था यांच्या सहकार्यातून आमदार अतुल भातखळकर यांच्या माध्यमातून शुक्रवारपासून ही माेहीम सुरू झाली. मालाड पूर्व, चिल्ड्रन्स ॲकॅडमी येथे आयोजित तीन दिवसीय विशेष लसीकरण मोहिमेचे भातखळकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच भविष्यात अशाप्रकारचे आणखी लसीकरण अभियान आयोजित करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या लसीकरण मोहिमेंतर्गत माध्यमकर्मी व पत्रकारांच्या अविरत सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १८ ते ४४ वयोगटातील १००पेक्षा जास्त पत्रकारांचेही मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

------------------------------------------

-

Web Title: A three-day special vaccination campaign for citizens in the age group of 18 to 44 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.