मध्य रेल्वेवर तीन दिवस विशेष 'पावर ब्लॉक'; CSMT येथील प्लॅटफॉर्मचा विस्तार, वेळापत्रक वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 09:00 AM2024-04-19T09:00:45+5:302024-04-19T13:43:08+5:30
१९, २० आणि २१ एप्रिल : शेवटची लोकल : कसारा : १२:१४ वाजता सीएसएमटीवरून सुटेल.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाटाच्या विस्तारासाठी मध्य रेल्वेकडून १९, २० आणि २१ एप्रिलच्या रात्री पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी, सीएसएमटी येथून कसाराकडे जाणारी रात्री १२.१४ची लोकल अखेरची असेल. त्यानंतरच्या कर्जत व ठाणे या दोन्ही गाड्या रद्द असतील. त्यामुळे कर्जत-खोपोलीकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत.
पॉवर ब्लॉकदरम्यान मध्यरात्री १२:३० ते पहाटे ४:३० या वेळेत सीएसएमटी ते भायखळा आणि हार्बरवरील वडाळा या मार्गावरील अप आणि डाऊन दिशेकडील वाहतूक बंद असेल. मेल व एक्स्प्रेस गाड्याही स्थगित असतील.
असे असेल वेळापत्रक
- १९, २० आणि २१ एप्रिल : शेवटची लोकल : कसारा : १२:१४ वाजता सीएसएमटीवरून सुटेल.
- ब्लॉकनंतर पहिली लोकल : कर्जत : पहाटे ४:४७ वाजता सीएसएमटीवरून सुटेल.
- अप धिम्या मार्गावर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल कल्याण येथून २२:३४ वाजता सुटेल.
हार्बर लाइनवर काय ?
- ब्लॉक पूर्वीची पहिली लोकल सीएसएमटी येथून ००:१३ सुटेल.
- ब्लॉक नंतरची पहिली लोकल सीएसएमटी येथून ०४:५२ सुटेल.
- ब्लॉक पूर्वीची शेवटची लोकल पनवेल येथून २२:४६ सुटेल.
- ब्लॉक नंतरची शेवटची लोकल वांद्रे येथून ०४:१७ सुटेल.
दादर स्थानकावर या गाड्या स्थगित केल्या जातील
१२८७० हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अतिजलद एक्स्प्रेस
१२०५२ मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्स्प्रेस
२२१२० मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्स्प्रेस
११०५८ अमृतसर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस
११०२० भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस
१२८१० हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल