ऑनलाइन टीम
कल्याण, दि. २४ - नदीत पोहण्यास गेलेल्या पाच जणांपैकी तीन अल्पवयीन मुलांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उल्हासनगर येथे घडली आहे. उल्हासनगमधील कॅम्प नंबर १ मधील सेंचुरी रेयॉन कॉलनीत राहणारी पाच मुले मंगळवारी दुपारच्या सुमारास एनआरसी कंपनीजवळ नदीत पोहण्यासाठी गेली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील तिघांचा मृत्यू झाला, इतर दोघेजण सुदैवाने वाचले. त्यांचे तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.