मालाडच्या अक्साबीचवर बुडणाऱ्या तिघांना जीवरक्षकांनी वाचवले

By मनोहर कुंभेजकर | Published: August 15, 2023 08:36 PM2023-08-15T20:36:24+5:302023-08-15T20:36:36+5:30

येथील ड्युटीवर असलेले जीवरक्षक नथुराम सुर्यवंशी, प्रसाद बाजी यांच्या लक्षात आली.

Three drowning people were rescued by lifeguards at Malad's Aksa Beach | मालाडच्या अक्साबीचवर बुडणाऱ्या तिघांना जीवरक्षकांनी वाचवले

मालाडच्या अक्साबीचवर बुडणाऱ्या तिघांना जीवरक्षकांनी वाचवले

googlenewsNext

मुंबई- स्वतंत्र दिनाची सुट्टी असल्याने पर्यटकांनी अक्सा बीचवर लोकांनी गर्दी केली होती. दुपारी मालाड पश्चिम, मालवणी ७ नंबर येथील मुशाली नूर हुसेन(१७), मोहमद झी शान(१८), अरबाझ कलम(१६) हे तीन तरुण पाण्यात उतरले. त्यांना पाण्याचा आणि अक्सा बीचवर असलेल्या लाटांचा अंदाज आला नाही. त्यांना समुद्राने आपल्या कवेत घ्यायला सुरुवात केली. हे तिघे तरुण ५० मीटर पाण्याच्या आत बुडायला लागले.

येथील ड्युटीवर असलेले जीवरक्षक नथुराम सुर्यवंशी, प्रसाद बाजी यांच्या लक्षात आली. त्यांनी धाव घेत पाण्यात उड्या मारल्या आणि या बुडणाऱ्या तीन तरुणांना पाण्याच्या सुखरूप  बाहेर  काढले.आणि पालिकेच्या सुरक्षा रक्षक (सी डी आर एफ) अमोल बने, किशोर भुसारे यांच्या स्वाधीन केले. 

Web Title: Three drowning people were rescued by lifeguards at Malad's Aksa Beach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.