त्या तिघांना मिळाले डोक्यावर छप्पर; मुख्यमंत्र्यांनी दिल्या घरांच्या चाव्या
By मनोहर कुंभेजकर | Published: September 9, 2023 03:31 PM2023-09-09T15:31:53+5:302023-09-09T15:32:26+5:30
डोक्यावर छप्पर मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
मनोहर कुंभेजकर, मुंबई-मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्र.३ मधील नवलेश पंडीत राहणार शिवाजी नगर, शिव शक्ती चाळ, केतकीपाडा, दहिसर ( पु) यांचे दि.२५ जुलै रोजी मुसळधार पावसात जमीनदोस्त झाले होते. तसेच प्रभाग क्र.१२ मधील नंदा खेडेकर आणि वैष्णवी पाटील यांचे मुसळधार पावसामुळे जमीन खचून संपूर्ण घर कोसळले होते.या दुर्घटनेत या तीन कुटुंबाचा संपूर्ण संसार, जीवनपुंजी गेली आणि ते बेघर झाले.
सदर घटना कळताच मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार व विभागप्रमुख प्रकाश सुर्वे यांनी तिन्ही नुकसानग्रस्तांची घरे पूर्णपणे स्वखर्चाने नव्याने बांधून दिली. गोकुळाष्टमीच्या दिवशी रात्री देवीपाडा दहीकाला उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असतांना त्यांच्या हस्ते या तीन कुटुंबांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. त्यांना डोक्यावर छप्पर मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
मागाठाणेच्या विकासात काही कमी पडणार नाही
आमदार प्रकाश सुर्वे हे चांगले काम करत असून मागाठाणेच्या विकासात काही कमी पडणार नाही. तसेच महापालिकेला सुद्धा सांगितले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार प्रकाश सुर्वे, प्रसिद्ध सिनेअभिनेते शक्ती कपूर,शाखाप्रमुख प्रकाश पूजारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.