Join us

ठाणो-बेलापूर मार्गावर बांधणार तीन उड्डाणपूल

By admin | Published: August 22, 2014 2:04 AM

ठाणो - बेलापूर मार्गावर प्रवास करणा:यांना एक खूशखबर आहे. कारण या मार्गावर एमएमआरडीए तीन ठिकाणी उड्डाणपूल व एका ठिकाणी भुयारी मार्ग बांधणार आहे.

ठाणो : ठाणो - बेलापूर मार्गावर प्रवास करणा:यांना एक खूशखबर आहे. कारण या मार्गावर एमएमआरडीए तीन ठिकाणी उड्डाणपूल व एका ठिकाणी भुयारी मार्ग बांधणार आहे. 
नवी मुंबई आणि ठाणो शहराला जोडणा:या 14़6 किलोमीटर लांबीच्या ठाणो-बेलापूर रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण नवी मुंबई महापालिकेने केल्यानंतर आता त्यावरील भुयारी मार्ग आणि जंक्शनच्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याची जबाबदारी एमएमआरडीएने घेतली आह़े यानुसार, या मार्गावर विविध उड्डाणपूल आणि भुयारी मार्गावर एमएमआरडीए अंदाजे 700 कोटी रुपये खर्च करणार आह़े यात पहिल्या टप्प्यात एमएमआरडीए सविता केमिकल, घणसोली नाका, तळवली नाका येथे उड्डाणपूल आणि महापे भुयारी मार्ग बांधणार आहे. त्यावर 123 कोटी 61 लाख रुपये खर्च करणार असून, त्यांच्या कामास लवकरच सुरुवात होणार आह़े