उबाठा गटाच्या तीन माजी नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित

By मनोहर कुंभेजकर | Published: September 26, 2023 11:30 PM2023-09-26T23:30:26+5:302023-09-26T23:31:19+5:30

जोगेश्वरी, वर्सोवा आणि विलेपार्ले विभागातील 100 हुन अधिक पदाधिकाऱ्यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

Three former corporators of Uddhav Thackeray group publicly joined Shiv Sena; Chief Minister Eknath Shinde was present | उबाठा गटाच्या तीन माजी नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित

उबाठा गटाच्या तीन माजी नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित

googlenewsNext

मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तीन माजी नगरसेवकानी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यात जोगेश्वरीमधील प्रभाग क्रमांक 73 चे माजी नगरसेवक प्रवीण शिंदे, वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील  माजी नगरसेविका प्रतिमा खोपडे आणि प्रभाग क्रमांक 88 च्या माजी नगरसेविका स्नेहल शिंदे यांचा यात समावेश होता.यावेळी शिवसेना नेते व उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा क्षेत्राचे शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर उपस्थित होते.

त्यांच्यासह जोगेश्वरी, वर्सोवा आणि विलेपार्ले विभागातील 100 हुन अधिक पदाधिकाऱ्यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. या सर्वांचे त्यांनी पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या वृत्तीमुळे तसेच त्यांच्या कार्यकर्तृत्वाने प्रेरित होऊन शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. 

यावेळी मुंबईत आतापर्यंत उबाठा गटाच्या 33 माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला असून आता ही संख्या 36 झाली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
महायुती सरकार सत्तेत आल्यापासून मुंबईत अनेक विकासकामे वेगाने सुरू झाली असून त्यामुळे या आंतरराष्ट्रीय शहराला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय शहर बनवण्याचा प्रयत्न सुरू झाला असल्याचे सांगितले. मुंबईतील रखडलेल्या इमारतींचा पूर्णविकासाला गती देऊन मुंबईतून बाहेर गेलेला मराठी माणूस पुन्हा मुंबईत घेऊन येणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. 

मुंबईतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करून हे शहर पूर्णपणे खड्डेमुक्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून  पाऊस थांबल्यानंतर सिमेंट  रस्ते करण्याच्या कामाला गती येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे येत्या दोन ते अडीच वर्षात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होणार असल्याचे सांगितले. सरकारच्या निर्णयक्षमतेकडे आकर्षित होऊन फक्त मुंबईच नव्हे तर संपूर्णमहाराष्ट्रातून अनेक जण शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत असल्याचे सांगितले.

आज ज्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्याना त्यांच्या प्रभागातील रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी नक्की विकसनिधी देण्यात येईल लोकांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी निधीची कमतरता जाणवणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Three former corporators of Uddhav Thackeray group publicly joined Shiv Sena; Chief Minister Eknath Shinde was present

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.