बिरवाडी : महाड तालुक्यामध्ये धोकादायक स्थितीत असलेले विद्युत खांब बदलण्यात यावेत, असा ठराव पंचायत समितीच्या आमसभेत गेल्या आठवड्यात करण्यात आला होता. त्यानुसार तालुक्यात ३०० विद्युत पोल मंजूर करण्यात आले आहेत.महाड तालुक्यातील वहुर ग्रामपंचायतीने आपल्या ग्रामपंचायत हद्दीतील धोकादायक विद्युत खांब बदलण्याकरिता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता यांच्याकडे गेली दोन वर्षे सतत पाठपुरावा केला.धोकादायक विद्युत खांब बदलावेत, याकरिता ग्रामपंचायतीच्या नोव्हेंबर, डिसेंबर २०१३ च्या मासिक सभेमध्ये प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. मावळतीवाडी या ठिकाणावरील १३ विद्युत खांब, बौध्दवाडी येथील ६, मधलीवाडी येथील ५, सुतार आळी ४, उगवती वाडी ६, मोहल्ला परिसर १ विद्युत खांब तसेच विद्युत दाब कमी होत असल्याने वाढीव विद्युतवाहिनी जोडून देण्याची मागणी केली होती. हा ठराव मंजूर करुन त्याची प्रत १ जानेवारी २०१४ रोजी कनिष्ठ अभियंता वहुर यांना देण्यात आली होती. ४ जून २०१४ रोजी महाडचे सहाय्यक अभियंता यांना गंजलेले विद्युत खांब बदलण्याबाबतचे पत्र सरपंच वहुर यांनी दिले होते. त्या पत्रात वहुर ग्रा. पं. हद्दीतील विजेचे खांब धोकादायक स्थितीत असून ते खांब कधीही तुटून जीवित व वित्तहानी होऊ शकते, त्यामुळे ते खांब बदलण्याची मागणी केली होती. मात्र या पत्राला कोणतेही उत्तर न मिळाल्याने वहुरच्या सरपंचांनी ७ जानेवारी २०१५ रोजी कनिष्ठ अभियंत्यांना पुन्हा स्मरणपत्र दिले आहे. मात्र अद्याप हे विद्युत खांब वहुरमध्ये आलेले नाहीत. (वार्ताहर)वाहिन्याही बदलणार!४मावळतीवाडीतील १३ विद्युत खांब, बौध्दवाडीत ६, मधलीवाडीत ५, सुतार आळी ४, उगवती वाडी ६, मोहल्ला परिसर १ विद्युत खांब बदलण्यात येणार आहे.४ याशिवाय कमी दाबाने वीज पुरवठा होणाऱ्या वीज वाहिन्याही बदलण्याची मागणी वहुर ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे.
महाडमधील तीनशे विद्युत खांब बदलणार
By admin | Published: February 02, 2015 10:48 PM