Join us

एकाच मागणीसाठी तीन स्वतंत्र शिष्टमंडळांची सहआयुक्तांकडे गाऱ्हाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 2:17 AM

पीएमसी बँक घोटाळा प्रकरण; जलद कार्यवाही करण्याची मागणी

मुंबई : ऐन सणासुदीच्या कालावधीत हजारो खातेदारांना आर्थिक विवंचनेत टाकणाऱ्या पंजाब अ‍ॅण्ड महाराष्टÑ सहकारी बॅँकेच्या (पीएमसी) घोटाळ्याप्रकरणी जलद कार्यवाही करावी, या मागणीसाठी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त राजवर्धन यांची खातेदारांच्या तीन स्वतंत्र शिष्टमंडळांनी गुरुवारी भेट घेऊन गाºहाणी मांडली. या प्रकरणाचा तपास जलदगतीने सुरू असून महिनाभरात बॅँकेचे कामकाज पूर्ववत सुरू केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले.

अनियमित कर्ज प्रकरणामुळे तोट्यात आलेल्या पीएमसी बॅँकेच्या खातेदारांवर खात्यातील जमा रक्कम काढण्यात गेल्या दीड महिन्यापासून निर्बंध घालण्यात आले आहेत. याविरोधात खातेदारांकडून आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. सुरू असलेल्या या आंदोलनाची दखल घेत गुरुवारी मुंबई कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि पीएमसी फोरम यांनी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त राजवर्धन यांची त्यांनी स्वतंत्रपणे भेट घेतली. या भेटीत पीएमसी बॅँकेवरील निर्बंध उठवून ती पूर्ववत सुरू करण्यासाठी आपल्याकडून या प्रकरणाचा तपास जलदगतीने करण्यात येत आहे. तपासाची पूर्तता झाल्यानंतर महिनाभरात रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया म्हणजेच आरबीआयकडून त्यावरील निर्बंध उठविण्यात येतील, असे त्यांनी सांगितल्याचे पीएमसी फोरमचे चंदर पुरुस्वामी, गुरबीकरुम सिंग, एसपीएस यादव यांनी सांगितले.

 

टॅग्स :पीएमसी बँक