तीन हाणामारीत १६ जखमी

By Admin | Published: March 18, 2015 10:38 PM2015-03-18T22:38:02+5:302015-03-18T22:38:02+5:30

रायगड जिल्ह्यात जमिनीच्या वादातून, किरकोळ कारणामुळे हाणामारी झाल्याच्या तीन घटना बुधवारी घडल्या.

Three injured in 16 injured | तीन हाणामारीत १६ जखमी

तीन हाणामारीत १६ जखमी

googlenewsNext

पोलादपूर : रायगड जिल्ह्यात जमिनीच्या वादातून, किरकोळ कारणामुळे हाणामारी झाल्याच्या तीन घटना बुधवारी घडल्या. या हाणामारीत १६ जण जखमी झाले असून एकूण २४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलादपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील कामधे गावात रस्त्यावर दुचाकी अंगावर घातल्याच्या कारणावरून मारुती गोगावले आणि दिलीप मुरडे या दोन गटात लाठ्या - काठ्याने बुधवारी सकाळी तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये पाच पुरुष व एक महिला जखमी झाली आहेत.
जखमींवर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या घटनेत कांडीराम तुकाराम गोगावले (३८), महादेव दगडू गोगावले (४४), विजय कोंडीराम गोगावले (२२), दिनेश चंद्रकांत मुरडे (२६), दिलीप चंद्रकांत मुरडे (२६), राजेश कोंडीराम गोगावले (२५), सीताराम तुळशिराम उमरठकर (२५), चंद्रकांत अनंत मुरडे (३०), दीपक चंद्रकांत मुरडे (२५), राजू कोंडीराम गांगावले (३६), कोंडीराम तुकाराम गोगावले (५६ ) (माडाची वाडीकामध्ये) आणि घाटकोपर, डोंबिवलीतील दोघे अशा तेरा जणांना अटक करण्यात आली आहे.
या घटनेमध्ये तक्रारदार मारुती गोगावलेसह अन्य सुनील गोगावले, अनिल गोगावले, सखाराम गोगावले, गोविंद गोगावलेसह शोभा घावरे ही महिला जखमी झाली आहे. आरोपींना मंगळवारी माणगाव कोर्टात हजर केले जाणार असून पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

१रेवदंडा : आंदोशी गावात घराच्या पडवीत नवीन चूल मांडण्याच्या रागातून दोन भावांच्यात मारामारी होवून परस्परविरोधी गुन्हे दाखल करून पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. वर्षा शेळके (४२) यांनी राहत्या घरातील पडवीत नवीन चूल मांडली. त्या रागातून दिलीप शेळके (४५), जयश्री शेळके (४०) यांनी त्यांना लाकडी फाट्याने मारहाण केली.

२दुसऱ्या गुन्ह्यात दिलीप शेळके (४५) यांनी केलेल्या तक्रारीनुसार दोन्ही भाऊ एकाच घरात दोन भागात राहतात. त्या घराच्या पडवीत दोन चुली असून चूल नवीन मांडल्याच्या रागातून वर्षा शेळके (४२), विलास शेळके (५१), दत्तात्रय शेळके (७५), सुलोचना शेळके (७०) व प्रिया बापळेकर (४०) सर्व रा. आंदोशी मारहाण केली. त्यावेळी फिर्यादीच्या पत्नी सोडवण्यास गेल्या असता विलास शेळके याने कोयत्याने वार करून दुखापत केली. पोलिसांनी पाचही जणांना अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

४महाड : जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीमध्ये ४ महिला जखमी झाल्याची घटना महाड तालुक्यातील शिंदेकोंड येथे घडली. शिंदेकोंड येथील गट नं. २४३ मधील शेतातले गवत काढणाऱ्या शांताबाई कडू (६५) यांचा गावातील काही महिलांबरोबरच वाद झाला. याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलिसामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मीराबाई जाधव (६०) यांच्या विरोधात महाड एमआयडीसी पोलिसांनी अदखल पात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून जमिनीच्या वादातून फसवणुकीचे प्रकारही परिसरात वाढले आहेत.

Web Title: Three injured in 16 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.