Join us

गणेशोत्सवात तीन लाख किलोग्रॅम निर्माल्य जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 4:07 AM

मुंबईगणेशोत्सवकाळात व अनंतचतुर्दशीला मुंबईत तब्बल २ लाख ६५ हजार २७९ किलोग्रॅम इतके निर्माल्य गोळा करण्यात आले आहे. यामध्ये ...

मुंबई

गणेशोत्सवकाळात व अनंतचतुर्दशीला मुंबईत तब्बल २ लाख ६५ हजार २७९ किलोग्रॅम इतके निर्माल्य गोळा करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे ६० हजार ९०० किलो इतके निर्माल्य हे गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी जमा करण्यात आले. संकलित करण्यात आलेल्या निर्माल्यावर विविध ३८ ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यात येत आहे. बाप्पाला वाहिलेल्या दूर्वा, फुले, हार इत्यादींच्या निर्माल्यापासून तयार करण्यात येणाऱ्या खताचा उपयोग प्रामुख्याने पालिकेच्या उद्यानांमध्ये करण्यात येणार आहे.

यंदाच्या गणेशोत्सवात सुमारे एक लाख ५८ हजार २२९ गणेशमूर्तींचे व सहा हजार ५३२ गौरीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

यापैकी ७९ हजार १२९ मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्यात आले. यामध्ये ३ हजार ५०२ सार्वजनिक गणेशमूर्तींचा समावेश आहे. तर, उर्वरित ८५ हजार ६३२ मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक विसर्जनस्थळी करण्यात आले.

७३ नैसर्गिक विसर्जनस्थळांमध्ये ८५ हजार ६३२ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये ८२ हजार ३३९ गणेशमूर्ती होत्या. तर, तीन हजार २९३ गौरीमूर्ती होत्या. ८२ हजार ३३९ गणेशमूर्तींपैकी ७७ हजार ८१४ या घरगुती तर ४ हजार ५२५ या सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती होत्या.

कोणत्या दिवशी, किती विसर्जन...

एक लाख ६४ हजार ७६१ मूर्तींचे विसर्जन झाले. यामध्ये सर्वाधिक म्हणजे ६६ हजार २९९ मूर्तींचे विसर्जन गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी झाले. त्या खालोखाल ४८ हजार ७१६ मूर्तींचे विसर्जन दुसऱ्या दिवशी (दीड दिवस) झाले. त्यानंतर ३४ हजार ४५२ मूर्तींचे विसर्जन गणेशोत्सवाच्या दहाव्या दिवशी करण्यात आले.