सलमानी कुटुंबातील चौघांचा दुर्घटनेत मृत्यू, तीन जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 06:07 AM2019-07-17T06:07:54+5:302019-07-17T06:08:16+5:30

डोंगरी परिसरात तांडेल रोडवर असलेली केसरबाई इमारत लगतची चार मजली अनधिकृत इमारत मंगळवारी कोसळली.

Three members of Salmani family killed in accident, three injured | सलमानी कुटुंबातील चौघांचा दुर्घटनेत मृत्यू, तीन जण जखमी

सलमानी कुटुंबातील चौघांचा दुर्घटनेत मृत्यू, तीन जण जखमी

Next

मुंबई : डोंगरी परिसरात तांडेल रोडवर असलेली केसरबाई इमारत लगतची चार मजली अनधिकृत इमारत मंगळवारी कोसळली. या इमारतीमध्ये १५ कुटुंब राहत होते, यापैकी दुसऱ्या माळ्यावर राहणाºया सलमानी कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कारण या कुटुंबातील एकाचा मृत्यू, तीनजण जखमी तर दोन बेपत्ता झाले आहेत.
केशरबाई इमारतीत सलमानी कुटुंबीय राहत होते. यामध्ये फिरोझ सलमानी, त्यांचा मुलगा नावेद, सून सना, मुलगी इकरा, नातू इब्राहिम, नात नशरा राहत होते, तर काल रात्री नातेवाईक मुझामिल मन्सूर सलमानी तिकडे राहायला आला होता. मंगळवारी सकाळी ही दुर्घटना घडली, तेव्हा इकरा ही दुकानामध्ये गेली होती. या दुर्घटनेत मुझामिल, सना, इब्राहिम आणि झुबेर याचा मृत्यू झाला असून, नावेद आणि फिझोज, नशरा जखमी आहेत. सलमानी कुटुंबीयांचे जवळच दुकान आहे. या दुकानात इकरा सकाळी त्या दुकानात गेली होती. भाऊ आणि आई, भाची जखमी, नातेवाईक मुझमीलचा यात मृत्यू झाला. मात्र, सकाळपासून माझी वहिनी सना आणि भाचा इब्राहिम अद्याप बेपत्ता आहे, असे सांगत इकराने टाहो फोडला. तर मुझामिल याची आई अलीमा यांचा ईदच्या अगोदर एक दिवस अगोदर कॅन्सरमुळे मृत्यू झाला होता. तो आणि त्याचा भाऊ झुबेर मन्सून सलमानी हा सुट्टीत सोमवारी रात्री मावशीकडे राहायला आला होता, पण सोमवारीची सुट्टी त्यांची अखेरची सुट्टी ठरली, मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.
सलमा यांचे सिटी स्कॅन
दुर्घटनेत जखमी सलमा अब्दुल शेख यांच्या तोंडाला किरकोळ मार लागला आहे, त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, तरीही खबरदारी म्हणून त्यांचे सिटी स्कॅन करण्यात येणार आहे, असे जे. जे. रुग्णालयाचे कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख श्रीनिवास चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: Three members of Salmani family killed in accident, three injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.