तीन महिन्यांपासून गांगणगावात अंधार

By admin | Published: April 10, 2015 11:53 PM2015-04-10T23:53:59+5:302015-04-10T23:53:59+5:30

तलासरीतील गांजणगावातील ६०० कुटुंबे गेल्या तीन महिन्यापासून अंधारात आहेत. जळलेला ट्रान्सफॉर्मर तीन महिन्यांपासून बदलला नसल्याने

Three months later, in Ganganagar, darkness | तीन महिन्यांपासून गांगणगावात अंधार

तीन महिन्यांपासून गांगणगावात अंधार

Next

तलासरी : तलासरीतील गांजणगावातील ६०० कुटुंबे गेल्या तीन महिन्यापासून अंधारात आहेत. जळलेला ट्रान्सफॉर्मर तीन महिन्यांपासून बदलला नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते आहे. विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या १० वी, १२ वी या महत्त्वाच्या परीक्षांच्या काळातही या विद्यार्थ्यांना अंधारात अभ्यास करावा लागला. वारंवार वीज वितरण कंपनीला कळवून, भेटूनदेखील वीजपुरवठा सुरळीत करण्यास वितरण कंपनीचे कर्मचारी टाळाटाळ करीत आहेत. तर दुसरीकडे वीज वितरण कंपनीचे अभियंता विद्युत पुरवठा बंद असल्याची कल्पनाच नसल्याचे सांगत आहेत.
गांगणगावातील कांदळीपाडा येथे वीज वितरण कंपनीची डीपी आहे. ती तीन महिन्यापूर्वी जळली. त्यामुळे या डीपी मधून वीजपुरवठा होणाऱ्या गांगणगावातील खोरीपाडा व पाटीलपाडा येथील ६०० कुटुंबाचा वीजपुरवठा खंडीत झाला. तीन महिन्यांपासून गांगणगाव खोरीपाड्यातील सुनिल राजड, राजेश मोरघा, राजेश वेडगा, अनिल वेडगा, जमसु बोबा, अल्वेस वेडगा, प्रकाश शेंदड, तसेच तर गावकरी वीजपुरवठा सुरू करण्यासाठी वीजवितरण कंपनीच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. गेल्या तीन महिन्यांत ‘दोन दिवसात पुरवठा सुरू करू’ या पलिकडे कोणतेही आश्वासन मिळत नसल्याने गावकऱ्यांत संताप आहे.

Web Title: Three months later, in Ganganagar, darkness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.