Join us

मुंबई हायकोर्टात तीन नवे न्यायाधीश

By admin | Published: January 02, 2015 1:52 AM

कालिदास लक्ष्मणराव वडाणे, इंदिरा कन्हैयालाल जैन व डॉ. शालिनी शशांक फणसाळकर-जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून गुरुवारी पदभार स्वीकारला.

मुंबई : कालिदास लक्ष्मणराव वडाणे, इंदिरा कन्हैयालाल जैन व डॉ. शालिनी शशांक फणसाळकर-जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून गुरुवारी पदभार स्वीकारला.मध्यवर्ती न्यायदालनात सकाळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मुख्य न्यायाधीश न्या. मोहित शहा यांनी तीन नव्या न्यायाधीशांना शपथ दिली. या वेळी इतर सहकारी न्यायाधीश व ज्येष्ठ वकील हजर होते. या नियुक्त्यांनी न्यायालयातील न्यायाधीशसंख्या ६७ झाली असून, आठ पदे रिक्त आहेत.न्या. कालिदास वडाणे याआधी पुण्याच्या नगर दिवाणी व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश होते तर न्या. इंदिरा जैन मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य होत्या. न्या. डॉ. शालिनी फणसाळकर-जोशी उच्च न्यायालयाच्या महाप्रबंधक होत्या. त्याआधी त्या मुंबईतील नगर दिवाणी व सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीश होत्या. शक्ती मिल खटल्यातील आरोपीला त्यांनीच फाशीची शिक्षा सुनावली होती. (प्रतिनिधी)