तीन बातम्या.....२ क्राईम, १ इतर

By admin | Published: September 20, 2014 11:30 PM2014-09-20T23:30:38+5:302014-09-20T23:30:38+5:30

तीन बातम्या.....२ क्राईम, १ इतर

Three news ... 2 crime, 1 other | तीन बातम्या.....२ क्राईम, १ इतर

तीन बातम्या.....२ क्राईम, १ इतर

Next
न बातम्या.....२ क्राईम, १ इतर
............................................
देशी शस्त्रे बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक
मुंबई : देशी बनावटीची शस्त्रे बाळगल्याप्रकरणी दोघांना चारकोप पोलिसांनी अटक केली आहे. या बनावट शस्त्राद्वारे दोघे गैरकृत्य करण्याच्या तयारीत होते. नौशाद चांदबाबू रवी ृ(२३), अजगर उर्फअन्सार शाह (२१) अशी दोघा अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. नौशाद हा वसई तुंगारेश्वर रोड येथील भोवर वाडा येथे राहणारा आहे. तर असगर याचे केश कर्तनालयाचे दुकान आहे. चारकोप परिसरात संशयित वाटल्याने त्यांची झडती घेतली असता ही बनावट शस्त्रे सापडली आहेत.
............................
दिंडोशीत हाणामारीत दोघे जखमी
मुंबई: दिंडोशी येथील संतोष नगर परिसरात ३ तरुणांचे आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादात दोन तरु ण जखमी झाल्याची घटना घडली. तिघे तरु ण हे पश्चिम बंगालचे रहिवासी असून कामानिमित्त मुंबईत एकत्र भाड्याने राहत होते . शुक्र वारी रात्री त्या तिघांमध्ये भांडण झाले. यात पिंटू दास व काली सुरेंद्र दास हे दोघे जखमी झाले. त्यांच्यावर शताब्दी रु ग्णालयात उपचार सुरु आहेत. यात आरोपी अभिषेक मोहतो हा फरार आहे. या प्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.................................
वर्सोव्यातील सर्वधर्मिय मदतफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई: पूरग्रस्त जम्मू-काश्मीरच्या मदतीसाठी येथील एकता मंचने वर्सोव्यात काढलेल्या सर्वधर्मिय मदतफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सेलिब्रिटीजसह येथील चिल्ड्रन वेल्फेयर सेंटर हायस्कूल,क्लाराज कॉलेज ऑफ कॉमर्सच्या ३००० विद्यार्थ्यांसह लायन्स क्लब ऑफ बॉम्बे ओशियानिक, हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन,शिख या विविध धर्मांसह येथील ४५ संस्थांनी मदतफेरीत सहभाग नोंदवला. प्राचार्य अजय कौल यांनी या मदतफेरीचे आयोजन केले होते. मदतफेरीत कमल हसनची कन्या श्रुती हसन, शेफाली जरीवाला, पराग त्यागी, निर्माती शबनम कपूर या देखील सहभागी झाल्या होत्या. अनेक गृहनिर्माण संस्थांमधील नागरिकांनी कपडे, पाण्याच्या बाटल्या, गृहपयोगी वस्तू, रोख रक्कम, धनादेश आदी भरभरून मदत या फेरीत जमा केली. हा सर्व मदतनिधी लवकरच काश्मीर येथील संबंधितांकडे देण्यात येणार असल्याची माहिती आयोजक प्राचार्य कौल यांनी दिली.

Web Title: Three news ... 2 crime, 1 other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.