तीन थोडक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:06 AM2021-08-01T04:06:40+5:302021-08-01T04:06:40+5:30
मुंबई - हुंडाविरोधी चळवळ, मुंबई या सामाजिक संस्थेच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्धापनदिनानिमित्ताने महाराष्ट्रातील प्रौढांसाठी (१८ वर्षांवरील व्यक्ती )खुली निबंध ...
मुंबई - हुंडाविरोधी चळवळ, मुंबई या सामाजिक संस्थेच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्धापनदिनानिमित्ताने महाराष्ट्रातील प्रौढांसाठी (१८ वर्षांवरील व्यक्ती )खुली निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विषय आहेत : (१) लॉकडाऊन काळातील समाजाची मानसिकता आणि त्याचे स्त्री जीवनावरील परिणाम. (२) लॉकडाऊन काळातील अनुभवलेली माणुसकी : स्वानुभव. (३) लॉकडाऊन काळातील व्यापार व अर्थकारण यांची बदललेली समीकरणे. स्पर्धंकांनी निबंध ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत आशा कुलकर्णी , महासचिव –हुंडाविरोधी चळवळ, ४ /५० विष्णूप्रसाद 'बी ' सोसायटी, शहाजीराजे मार्ग, पार्ले बिस्किट फॅक्टरीजवळ, विलेपार्ले (पूर्व ) मुंबई ४०००५७ येथे पाठवावा. इच्छुक निबंध लेखकांच्या सोयीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवण्यात येत आहे.
........................................
व्याख्यानमालेचा उत्तरार्ध १ ऑगस्टपासून
मुंबई - महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचा उत्तरार्ध १ ऑगस्टपासून सुरू होत आहे. पूर्वार्धामध्ये नामवंत ४४ वक्त्यांची व्याख्याने झालेली आहेत. या व्याख्यानमालेचे नेटकऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले.
अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई - केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील २०२१-२२ या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्रासाठी प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रमधील विद्यार्थ्यांसाठी बरगढ (ओडिशा) मध्ये १३ व वेंकटगिरीकरिता २ जागा उपलब्ध आहेत. या जागेवर प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर / सोलापूर / मुंबई / औरंगाबाद यांच्यामार्फत विहित नमुन्यात २० ऑगस्ट २०२१ पर्यंत प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी याबाबतचे आपले अर्ज संबंधित प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग यांच्याकडे सादर करावा. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या http://dirtexmah.gov.in/ संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयात देखील उपलब्ध आहे, असे वस्त्रोद्योग आयुक्त, महाराष्ट्र राज्य श्रीमती शीतल तेली-उगले यांनी कळविले आहे.