मुंबई : देशभरातील नामवंत आठ चित्रकारांनी साकारलेल्या त्यांच्या निवडक आणि वैशिष्ट्यपूर्ण चित्रकृतींचे प्रदर्शन वरळी येथील नेहरू सेंटर कला दालनात २१ ते २७ सप्टेंबरदरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. देशातील विविध राज्यातील हे चित्रकार असून भानू गोवानी, स्वाती द्रविड, रणजित वर्मा, गोपाल गाढवे, मीना राठोड, मनीषा राव, शिल्पा राठोड आणि प्रकाश जाधव या कलाकारांचा सहभाग आहे.
यशवंत सिन्हा यांचे व्याख्यान
मुंबई : ॲमिटी इन्स्टीट्यूट ऑफ लिबरल आर्टसने अफगाण क्रायसिस पास्ट, प्रेझेंट अँड वे अहेड या विषयावर माजी परराष्ट्र मंत्री यशवंत सिन्हा यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. २२ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून अन्य तपशीलवार माहिती संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
वैज्ञानिक संस्कृतीविषयावर परिषद
मुंबई - गुरुनानक कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाने नॅशनल सेंटर फाॅर सायन्स सेंटर याच्या साहाय्याने वैज्ञानिक संस्कृती विषयावर परिषद आयोजित केली आहे. २८ सप्टेंबरला ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.