Join us

डेंग्यूमुळे तीन दिवसांत दोघांनी गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 2:37 AM

मुलुंडमध्ये एकाचा बळी; कुटुंबातील दोघांना लागण, विलेपार्लेत तीन वर्षीय मुलीचा मृत्यू

मुंबई : डेंग्यूमुळे तीन दिवसांत दोघांना जीव गमवावा लागला. डेंग्यूमुळे मृत्यू झालेल्यांमध्ये मुलुंडमधील ३२ वर्षीय व्यक्तीचा समावेश असून त्याच्याच कुटुंबातील दोघांना डेंग्यूची लागण झाली आहे. तर, विलेपार्लेतील एका तीन वर्षीय मुलीलाही डेंग्यूमुळे जीव गमवावा लागला.मुलुंडमधील ‘मॅरेथॉन गॅलॅक्सी’ या इमारतीत सहाव्या मजल्यावर राहणाऱ्या एका ३२ वर्षीय व्यक्तींचा बुधवार, २४ जुलै रोजी डेंग्यूमुळे मृत्यु झाला. त्याच्याच कुटुंबातील दोघांना डेंग्यूची लागण झाली असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

यापूर्वी विलेपार्ले (पूर्व) आंबेवाडीतील तीन वर्षांची नेत्रा संजय शिवगण हिचा डेंग्यूमुळे २२ जुलै रोजी विलेपार्ले पश्चिम येथील नानावटी रुग्णालयात मृत्यू झाला. नेत्राचे वडील संजय शिगवण यांनी सांगितले की, तिला दोन दिवस ताप आला होता. त्यामुळे तिला ११ जुलै रोजी नानावटीमध्ये दाखल करण्यात आले. येथील डॉ. हिरेन जोशी तिच्यावर उपचार करत होते. दरम्यान, तिची प्रकृती अधिकच खालावल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवले होते. दरम्यान २२ जुलै रोजी तिचा मृत्यू झाला. एकुलत्या एक मुलीचा डेंग्यूने बळी घेतल्याने या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यानंतर आता स्थानिक लोकप्रतिनिधींनी बुधवारी सकाळी पालिकेच्या के. पूर्व वॉर्डच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन आंबेवाडी तसेच आजूबाजूच्या परिसरात डेंग्यू उत्पत्ती विरोधी जनजागृती व धूम्र औषध फवारणी त्वरित सुरू केली.

गॅलरीतील साहित्यात आढळल्या अळ्यामुलुंडमधील घटनेनंतर महापालिकेच्या कीटक नियंत्रक खात्याद्वारे सोसायटीची पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान सोसायटीमध्ये ४ ठिकाणी डेंग्यूच्या विषाणूंचा प्रसार करणाºया ‘एडिस एजिप्टाय’ डासांच्या अळ्या आढळून आल्या. विशेष म्हणजे सहाव्या मजल्यावरील ज्या फ्लॅटमधील व्यक्तींना डेंग्यूची लागण झाली, त्याचा फ्लॅटच्या खाली असणाºया पहिल्या मजल्यावरील फ्लॅटच्या गॅलरीत ठेवलेल्या साहित्यात साचलेल्या पाण्यात डेंग्यूचे प्रसार करणाºया एडिस डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. या सर्व अळ्या महापालिकेच्या पथकाद्वारे तात्काळ नष्ट करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :डेंग्यू