वृद्धेच्या अवयवदानातून तिघांना जीवदान

By संतोष आंधळे | Published: May 24, 2024 09:27 PM2024-05-24T21:27:55+5:302024-05-24T21:28:31+5:30

गेल्या काही वर्षांत अवयव निकामी झालेल्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

Three people were given life by organ donation from an elderly person | वृद्धेच्या अवयवदानातून तिघांना जीवदान

वृद्धेच्या अवयवदानातून तिघांना जीवदान

मुंबई: साठ वर्षांच्या महिलेच्या अवयवदानामुळे दोन रुग्णांना जीवदान मिळाले आहे. यकृत, दोन किडन्या, डोळे, उतीपेशी दान केले. हे मुंबई शहरातील या वर्षातील एकोणिसावे अवयवदान आहे. अंधेरी येथील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात बुधवारी महिलेचा मेंदूमृत झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला.

राज्यात अवयवांची गरज असणाऱ्यांची मोठी प्रतीक्षा यादी आहे. ज्या तुलनेत अवयवांची गरज आहे, त्या तुलनेत आपल्याकडे मेंदूमृत व्यक्तीचे अवयवदान होत नाही. याकरिता अवयवदान जनजागृतीची गरज असून, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातून यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

गेल्या काही वर्षांत अवयव निकामी झालेल्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या अशा रुग्णांची राज्यातील प्रतीक्षा यादी महिन्यागणिक वाढत आहे. एका वर्षाला मेंदूमृत व्यक्तीकडून अवयवदान होण्याची संख्या आणि अवयवाची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे.

Web Title: Three people were given life by organ donation from an elderly person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.