थकबाकी, वीज खरेदी खर्च आणि वीज हानी कमी करणे हीच त्रिसूत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:09 AM2021-09-16T04:09:08+5:302021-09-16T04:09:08+5:30

मुंबई : ग्राहकांकडे वीज बिलापोटी असलेली थकबाकी, वीज खरेदी खर्च आणि वीज हानी याचे प्रमाण कमी करणे हीच ...

The three principles are to reduce arrears, power purchase costs and power losses | थकबाकी, वीज खरेदी खर्च आणि वीज हानी कमी करणे हीच त्रिसूत्री

थकबाकी, वीज खरेदी खर्च आणि वीज हानी कमी करणे हीच त्रिसूत्री

Next

मुंबई : ग्राहकांकडे वीज बिलापोटी असलेली थकबाकी, वीज खरेदी खर्च आणि वीज हानी याचे प्रमाण कमी करणे हीच आपली त्रिसूत्री आहे, यासाठी आपण सर्वांनी काम करायचे असून, आपले सहकार्य अपेक्षित असल्याचे प्रतिपादन महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले. महावितरणच्या प्रकाशगड येथील मुख्यालयात भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी आयोजित अभियंता दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

विजय सिंघल म्हणाले की, महावितरणपुढे अनेक समस्या आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही. परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीने काम करावे लागणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी वसुलीमध्ये चांगली कामगिरी झाली आहे. अनेक अडचणी आल्या आणि काम करणाऱ्या माणसाला अडचणी येणारच हा विचार करून आपले नेहमीचे कार्य करीत राहा. आपल्या सेवांचा दर्जा वाढवायला हवा. ग्राहक राजा आहे, असे समजून स्वत:साठी व कंपनीसाठी आपल्याला काम करायचे आहे.

भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचे विचार परिघापलीकडील होते. अभियंता देश घडवीत असतो. राष्ट्रनिर्मिती करतो. त्याचे विचार इतरांपेक्षा वेगळे असतात. त्यांच्यात वेगळी क्षमता असते. जगात जे कुणी करू शकत नाही, ते अभियंता करू शकतो. अभियंता म्हणून आपल्यात असलेल्या पूर्ण क्षमतेने आपण काम करायला हवे. केवळ दैनंदिन काम नव्हे, तर त्याचसोबत काही वेगळे काम करणे म्हणजे अभियंता होय. याशिवाय आपल्याला कामाचे समाधान मिळविता येणार नाही. महावितरण ही माझी स्वत:ची कंपनी आहे, म्हणून सतत कार्यरत रहाण्याचे आवाहनही विजय सिंघल यांनी केले.

Web Title: The three principles are to reduce arrears, power purchase costs and power losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.