काेराेनाच्या लसीकरणासाठी लाेकसंख्येचे तीन प्राधान्य गट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2021 06:24 AM2021-01-03T06:24:39+5:302021-01-03T06:25:00+5:30

Corona Vaccine: कोविड लस वितरणासाठी उपलब्ध मनुष्यबळ क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने विविध पातळीवर हाताळणाऱ्यांसाठी सविस्तर प्रशिक्षण सत्रे तयार केली आहेत.

Three priority groups of the population for corona vaccination | काेराेनाच्या लसीकरणासाठी लाेकसंख्येचे तीन प्राधान्य गट

काेराेनाच्या लसीकरणासाठी लाेकसंख्येचे तीन प्राधान्य गट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लसीकरणाच्या प्रक्रियेत लस व्यवस्थापनाची महत्त्वाची भूमिका असल्यामुळे, प्रशिक्षकांना, तसेच विविध राज्यांत लस वितरणाचे व्यवस्थापन करणाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. केंद्र शासनाने याकरिता लोकसंख्येचे तीन प्राधान्य गट केले आहेत. त्यात आरोग्यसेवा कर्मचारी साधारणतः एक कोटी, फ्रंटलाइन वर्कर्स साधारणपणे दोन कोटी, प्राधान्य वयोगट साधारणतः २७ कोटी असे गट प्राधान्याने लसीकरणासाठी केले जातील.


कोविड लस वितरणासाठी उपलब्ध मनुष्यबळ क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने विविध पातळीवर हाताळणाऱ्यांसाठी सविस्तर प्रशिक्षण सत्रे तयार केली आहेत. वैद्यकीय अधिकारी, लस देणारे, लस देणाऱ्यांची पर्यायी फळी, कोल्ड चेन हाताळणी करणारे, सुपरवायझर, डेटा व्यवस्थापक, आशा समन्वयक आणि इतर अशा विविध पातळ्यांवर लसीकरण प्रक्रियेचा भाग असणाऱ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीची प्रशिक्षण सत्रे आहेत.


जनजागृतीसाठी साेशल मीडियाचा वापर
लसीकरण प्रक्रिया आयोजित करण्याबाबतचे सर्व प्रशिक्षण, संपूर्ण लसीकरण व्यवस्थापनाच्या दृष्टीने को-विन या आयटी प्लॅटफॉर्मचा वापर, एचआर कोल्ड चेन तयारीचे उपयोजन, प्रतिकूल परिस्थितीत योग्य व्यवस्थापन, संपर्क आणि आंतरक्षेत्रीय समन्वय, जैव-वैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन, संसर्ग रोखण्यासाठी नियमावली या सर्व बाबींचा या प्रशिक्षणात समावेश आहे. लसीकरण प्रक्रियेच्या जनजागृतीसाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात येणार असून, त्यासाठी सामाजिक, राजकीय, मनोरंजन सृष्टीतील दिग्गजांची मदतही घेण्यात येणार आहे.

Web Title: Three priority groups of the population for corona vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.